मार्ग 12 पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे, जिल्हा हदद या सुमारे 21.500 किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी 17 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला:-माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचेकडे पाठपुरावा करून मिळविलेल्या निधीमुळे कोपरगाव तालुक्यातून जाणा-या नागपुर हायवेच्या पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. नुकतेच या रस्त्याचे काम पुर्ण झाल्याने तालुक्यातील पुर्व भागातील नागरीकांचा येण्या-जाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे युवक कार्यकर्ते गोरख टुपके यांनी सांगितले.
अहमदनगर व औरंगाबाद जिल्हयाला जोडणा-या नागपूर महामार्गाची मोठया प्रमाणात दुरावस्था झालेली होती. या संदर्भात पुर्व भागातील विविध गावातील ग्रामस्थांनी तत्कालीन आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचेकडे मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचे सौ कोल्हे यांनी पत्रव्यवहार केला. त्यानुसार प्रमुख राज्य मार्ग 12 पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे, जिल्हा हदद या सुमारे 21.500 किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी 17 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसापासुन सुरू होते, नुकतेच या रस्त्याचे काम पुर्ण झाले असुन पुर्व भागातील नागरीकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्या अनेक दिवसापासुन शेतकरी, विदयार्थी, दुधउत्पादक यांना या रस्त्यावरून ये जा करण्यास मोठी कसरत करावी लागत होती. मतदार संघामध्ये विविध रस्त्यांचे कामी मार्गी लावुन आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविलेल्या सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने तसेच केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबददल या भागातील नागरीकांनी ना गडकरी व सौ कोल्हे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *