कोपरगांव प्रतिनिधी:-
अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद या तीन जिल्हयाच्या सीमेवर कोपरगांव तालुका असुन कोपरगांव शहरापासून नगर मनमाड महामार्ग गेला असुन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थक्षेत्र शिर्डी कोपरगांवपासून अवघ्या १६ किलोमिटर अंतरावर असल्याने या मतदार संघातुन मोठया प्रमाणांत देशभरातील वाहनांची वर्दळ असते तेंव्हा दळणवळणांच्या सुलभतेसाठी २०२१.२२ अंतर्गत गोदावरी नदीवर केंद्रीय विकास निधीतुन वारी येथे २५ कोटी रूपये तर आणि २८ कोटी रूपये खर्चातुन सुरेगांव अशा दोन ठिकाणी नव्याने पुलाचे बांधकाम करावे या मागणीचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना दिले.
श्री. नितीन गडकरी हे गुरूवारी नगर जिल्हा. दौ-यावर आले असता त्यांची सौ. स्नेहलता कोल्हे व माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी भेट घेतली. सौ. कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, धारणगांव कुंभारी कोळपेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग ८५ ते सुरेगांव सांगवीभूसार धामोरी रवंदे या प्रमुख जिल्हा मार्ग ४ मध्ये (३-५००) सुरेगांव गावाजवळ गोदावरी नदीवर २८ कोटी रूपये खर्चाचा तर सावळीविहीर रूई शिंगवे वारी भोजडे गोधेगांव शिरसगांव या प्रमुख जिल्हा मार्ग १३ रस्त्यावर साखळी कमांक १२ मध्ये वारी गावाजवळ गोदावरी नदीवर २५ कोटी रूपये खर्चाची अशी दोन पुलांची कामे तातडीने व्हावी म्हणून असंख्य वाहनधारकासह शेतक-यांची मागणी आहे, तेंव्हा विशेष बाब म्हणून या दोन्ही पुलाचे काम केंद्रीय निधी सीआरएफ अंतर्गत पुर्ण करावे असे शेवटी म्हटले आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनीही मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करून कोपरगांव विधानसभेच्या निकडीच्या रस्तेकामासाठी निधी मंजूर व्हावा म्हणून अपेक्षा व्यक्त केली त्यावर नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


फोटोओळी:- कोपरगाव
केंद्रीय रस्ते वाहतुक व परिवहन मंत्री नितीन गडकरी गुरूवारी नगर जिल्हा दौ-यावर आले असता त्यांची माजीमंत्री शंकरराव कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी भेट घेवुन त्यांच्याकडे गोदावरी नदीवर वारी व सुरेगांव येथे नव्याने दोन पुल बांधण्यांसाठी केंद्रीय निधीतुन ५३ कोटी रूपये मंजुर करावे या विषयावर चर्चा केली.
