
कोपरगाव प्रतिनिधी:-
अंतर्मुख हा ! सावध व्हा ! भविष्यकाळ फक्त आर्थिक तरतुदींनी सुरक्षित होत नाही . तो तुमच्यासमोर तुमच्या हातांनी वाढतो आहे . मुलांना लाडावू नका , पण प्रेम द्या त्यांच्याकडे लक्ष असू द्या , पण करडी नजर नको योग्य वेळी शिस्त लावणारा स्वर असू द्या , पण स्वरात संस्कार असूद्या . ती लहान आहेत याचा अर्थ तुम्ही काय बोलता हात , कसे वागता आहात ते त्यांना कळत नाही असे नाही.हे आपला काम आहे.हे आपलं अज्ञान आहे ! त्याना मायेनं दुबळं बनवू नका , तर वात्सल्याच्या स्पर्शान स्वतंत्र निर्णय घेण्याइतकं सक्षम करा कुठलीही दोन्ही टोके वाईट अतिप्रेमाने मुलांना लाडावून ठेवणारे पालक असतात नको त्या गरजा स्वताच निर्माण करून पुरवणारे , उधळपट्टी करणारेही पालक असतात . हे प्रेम नव्हे.ही माया नव्हे . हे वात्सल्य नव्हे हे अज्ञान आहे ! थोडं स्पष्ट लिहिलं समजून घ्याल पण हेतु तर जिव्हाळ्याचा होता ना! थोडी डुलकी घेत असाल तर जागे व्हाल हीच अपेक्षा..!

गोरेसर:-9850613612.
