

कोपरगाव प्रतिनिधी:- चांदेकसारे येथे भगिरथजी होन यांनी सुरू केलेल्या ‘बासुरी’ या प्युअर व्हेज रेस्टॉरंटचे उदघाटन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.

याठिकाणी निसर्गरम्य वातावरणासोबतच श्रीक्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


यावेळी ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुलजी जाधव, सौ. मंगलताई जाधव, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, पोहेगाव पतसंस्थेचे अध्यक्ष नितीनजी औताडे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकरजी दंडवते, मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेबजी तवर, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त महेंद्रजी शेळके, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेबजी कोते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिनजी रोहमारे, काकासाहेब जावळे, पंचायत समिती सदस्य सौ. अनुसयाताई होन, साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते, शिर्डीचे उपनगराध्यक्ष सचिनजी कोते, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेशजी पवार, सुधाकरजी शिंदे, मुकुंदराव कोते, पंकजजी होन, सुनीलजी बोरा, धनराजजी जगताप, रोहिदासजी होन, अश्वमेधजी होन, अक्षयजी होन, हेमंतजी होन, सौरभजी होन आदी उपस्थित होते.


