मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला येऊ इच्छिणाऱ्यांना स्थानिक संयोजन समिती उरळी कांचन यांचे सहकार्याचे आवाहन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-
मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे द्वैवार्षिक अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे होत आहे. या अधिवेशनास येणाऱ्यांसाठी अधिवेशन स्थळी पोहोचल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे..  नोंदणी करताना नाव, गाव, फोन नंबर, इ-मेल, वृत्तपत्राचे नाव, किती वर्षांपासून परिषदेचे सदस्य आहात आदि माहिती भरावी लागेल.. त्यासाठी २०० रूपये नोंदणी शुल्क आकारले जाईल. २०० रूपयांमध्ये दोन दिवस निवास व्यवस्था, दोन दिवस भोजन, चहा, नाश्ता दिला जाईल. शिवाय वेलकम किट मध्ये स्मरणिका, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास सांगणारे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पुस्तक, पेन, राइटिंग पॅड, आदि वस्तू एका बॅगमध्ये दिल्या जातील. नोंदणी करताना जेवणाचे कुपन्स दिले जातील. ते कुपन काऊंटरवर दाखविल्याशिवाय भोजनगृहात प्रवेश  मिळणार नाही..
परिषदेच्या अधिवेशनास सुमारे दोन ते अडीच हजार पत्रकार येत असले तरी शिस्त पाळावी लागते आणि पाळली जाते.. उरूळी कांचन येथे ज्या वास्तूत अधिवेशन संपन्न होत आहे ती संस्था महात्मा गांधी यांच्या नावाने ओळखली जाते. शिवाय ती महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने  सुरू झालेली आहे..तेव्हा संस्थेचं पावित्र्य जपावे लागेल,, अपेयपान, गुटखा, तंबाखू या सर्व वस्तु येथे वर्ज्य आहेत. याची सर्वांनी नोंद ध्यावी आणि सहकार्य करावे  असे आवाहन स्थानिक संयोजन समिती, अ.भा. मराठी पत्रकार परिषद 44 वे राष्ट्रीय अधिवेशन उरळी कांचन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *