
कोपरगाव प्रतिनिधी:- शहरातील लक्ष्मी नगर भागामधील आधीच रस्त्याची चाळण झाली आहे . यातच अनेक ठिकाणी रस्त्यातून गेलेल्या पाईप लाईन लिकेज किंवा इतर कारणाने रस्ते फुटून खड्डे पडत आहे. अशा या खड्ड्यांमध्ये पावसाचे व गळतीचे पाणी साठल्याने अपघात होण्याच्या भीतीने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. असाच एक खड्डा वरील गटार फुटल्याने भागातील म्हसोबा चौकात पडला होता. सदर खड्डा बुजविण्यासाठी पालिका प्रशासनाला मोठ्या मिन्नतवाऱ्या कराव्या लागल्या , तेव्हा कोठे पालिकेने हा खड्डा बुजविला मात्र त्यात मुरूम दगड टाकण्या ऐवजी चक्क काळी माती टाकल्याने हे खड्डे बुजविण्याचे काम म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा असे झाले आहे.आणि त्याचा प्रत्येहही एक मालवाहतूक ट्रक फसल्या नंतर आला .
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर म्हसोबा चौक या ठिकाणी जास्तीच्या वर्दळीच्या रस्त्यावर गेल्या आठवड्यात साचलेल्या पाण्यामुळे रस्ता क्रॉसिंग असलेली गटार ही रस्त्याच्या मधोमध खचल्यामुळे गेली दहा दिवस नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. गैरसोय होऊन शेजारील उच्च दाबाच्या विद्युत रोहित्राला खेटून किंवा वळसा घालून जावे लागत होते.त्यात आज मालवाहतुक ट्रक या चिखल युक्त भराव असलेल्या गटारावरून गेल्यामुळे फसला . ट्र्क फसल्यामुळे चालकाला मोठया अडचणीला सोमोरे जाण्याची वेळ आली आहे.
नगरपालिका प्रशासनाने सुरुवातीलाच मातीच्या खड्यात मुरूम भरून रोलिंग केली असती तर असा प्रसंग उदभवला नसता. मात्र पालिका प्रशासनाने खड्डा मातीने बुजविल्याने नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाहि मनस्ताप सहन करावा लागला आहे. आता पुन्हा नव्याने गटार दुरुस्त होणार का? आणि कधी होणार ? त्यात दसरा दिवाळीसारखे सण पुढे आल्यामुळे नागरिकांना पुन्हा अडचणीचा सामना करावा लागणार या चिंतेने ग्रासले आहे.
