

कोपरगाव प्रतिनिधी:- माणसाने मधमाशी प्रमाणे कणाकणाने ज्ञान आत्मसात केले पाहिजे कोणते ज्ञान कधी कामी येईल ते सांगता येत नाही सततच्या वाचनाने बौद्धिक क्षमता वाढते विकसित होत असते वाचन माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहे असे विचार डॉ दादासाहेब गलांडे यांनी वर्तमानपत्र वितरक दिन व माजी राष्ट्रपती कै डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्म दिन ( वाचन प्रेरणा दिन) प्रसंगी वर्तमानपत्र वितरक यांच्या सन्मान सोहळ्यात व्यक्त केले



स्वागत प्रास्ताविक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी केले वर्तमानपत्र वितरक प्रातीनीधीक स्वरूपात संभाजी महाराज चौक येथील जाधव माधव बागेजवळ चिंतामणी राजेंद्र हाबडे बसस्थानक परिसरात प्रकाश देवरे यांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला समारंभासाठी सेवानिवृत्त शिक्षक गांगवे फुलविकरेते संतोष वढणे दूध विक्रेते कोलते अभियंता शेख गावजागवून जनजागृती करणारे बेट भागातील वासुदेव सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते
वाचन प्रेरणा दिन प्रसंगी वर्तमानपत्र ग्रंथ लेखन केले पाहिजे वाचकांच्या मनात चैतन्य निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य ग्रंथ करतात असे विचार या प्रसंगी व्यक्त केले
आभार प्रकाश देवरे यांनी मानले
