कोपरगावात शिवसेनेचा वाढता प्रभाव,सप्ताहात दुसर्यांदा शिवसेनेत असंख्य युवकांचा प्रवेश…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात शिवसेनेच्या प्रभाव वाढत असुन शहरातील विविध प्रभातील युवक शिवसेनेत प्रवेश करत आहे.दोन तिन दिवसापूर्वी गांधीनगर भागातील काही तरूणांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सप्ताहात पुन्हा एकदा मोठ्या संख्येने तरूणांनी आज प्रवेश घेतला आहे. उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,शहर प्रमुख कलविंदर डडियाल,एस.टी.कामगार सेनेचे शहराध्यक्ष भरत मोरे.अस्लम शेख विधानसभा संघटक,इरफान शेख जिल्हा प्रमुख वाहतूक सेना,विकास शर्मा, आकाश कानडे उपशहरप्रमुख ,बाळासाहेब सांळुके शहर संघटक,वैभव गिते शहर संघ संघटक,विशाल झावरे,विक्रांत झावरे,ऋषीकेष पवार,अमित भास्कर, वैभव हलवाई,ग्राहक संरक्षण मंचाचे राहुल देशंपाडे,राहुल हसंवाल,सतिष शिंगाणे, मंगेश देशमुख यागेश उशिर याच्या उपस्थित शिवसेनेत या युवकांचा प्रवेश झाला आहे.हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आदर्श मानत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची कार्यपद्धती आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कामकाज चालु असुन जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात शिवसेनेचे कामकाज जोरदार चालु असुन शहरप्रमुख कलविदरसिंग डडियाल, भरत मोरे,अस्लमभाई शेख सर्व पदाधिकारी यांच्यावर विश्वास टाकत शहरातील तरूणांनी प्रवेश केला आहे.याप्रसंगी शाखा क्रं ५ चे योगेश उशिरे यांची कोपरगाव शहर समन्वयकपदी नियुक्ती केली अाहे.कोपरगाव शहरातील तसेच या विभागातील नागरिकांचे कामे आम्ही करु यासाठी कटीबध्द राहू असे प्रतिपादन योगेश उशीर यांनी केले आहे.पुढे एस.टी कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे म्हणाले की,गोर गरिब शोषित पिडित समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना नेहमी पुढे असते.शहरातील युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्या मुळे शिवसेनेची ताकद वाढत आहे.कोपरगाव विधानसभा संघटक अस्लमभाई शेख म्हणाले की,युवक देशाची ताकद आहे.ज्या पक्षात युवकांची संख्या असते तो पक्ष नेहमी सत्तेत असतो .शहरप्रमुख कलविंदर डडियाल म्हणाले की,जनतेची कामे करण्यासाठी आम्ही कटीबध्द असुन जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जनेतच्या समस्या सोडवत असुन यापुढेही सोडवत राहू शहरात विविध भागातील तरुण शिवसेनेत दाखल होत असुन येणार्या नगरपालिकेच्या निवडणुकीत याचा फायदा पक्षाला होणार आहे.शिवसेनेची नगरपालिकेत सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार अाहे. शहरातील तरूणांचा शिवसेनेत प्रवेशा मुळे प्रस्थापित पक्षाना झटका बसत आहे.राहुल काळे,अमोल मेहेरे,चंदन मोहरे,प्रतीक पगारे,मंगेश मरसाळे,शिवाजी ससाणे,विलास भालेराव,दादू खोदकर,आकाश सोलसे,रोहित खंडांगळे,नाना नेटारे,पवन साटोटे आदि कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे.या प्रवेश सोहळ्याला निलेश पवार,गौरव गुप्ता,वैभव हलवाई,विकी चव्हाण उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *