शांत संयमी प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. दत्तात्रय मुळे यांचे क्लिनिक सदैव मदतीला तत्पर असते:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :- डॉक्टर म्हणजे कोणी देवदूत नाही किंवा अंतर्मनातील ओळखणारे नाही परंतु वेळप्रसंगी देवापेक्षा कमी नाहीत हे नक्की डॉक्टर लोक अनुभव अभ्यास अनुमान अंदाज प्रगततंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत करून योग्य पद्धतीने कोणत्याही आजाराचे निदान उपचार करून रूग्ण ठिक करण्यासाठी प्रयत्न करीत असतात पण त्या साठी रूग्णांची मानसिकता मनाची आणि शरीराची भक्कम असावी लागते अशा वेळी बरोबरीच्या नातेवाईकांनी धिर देणे आधार देणे आशावादी राहणे आवश्यक असते हे सर्व जुळून आले तर रूग्ण लवकरच बरा होतो यात शंकाच नाही
कोपरगाव तालुक्यातील एक नामवंत डॉक्टर म्हणून डॉ दत्तात्रय मुळे यांचे नाव पुढे येते शांत संयमी प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेले डॉ दत्तात्रय मुळे यांचे क्लिनिक सदैव मदतीला तत्पर असते शहर व ग्रामीण भागातील बरेचसे रूग्ण ठिक होवून दुवा देत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून सेवारत असणार्या या दवाखान्यात म गांधी योजनेंतर्गत दर मंगळवारी जेष्ठ नागरिक व गोरगरीब जनतेसाठी अल्प दरात तपासणी उपचार पद्धती आहे
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना या दवाखान्यात अनेक असंख्य प्रकारचे पेशंट बरे होवून सुखरूप घरी गेले आहेत डॉक्टर दत्तात्रय मुळे त्यांची दोन मुले डॉ संकेत डॉ शिरीष दोनहि सुना मनापासून रूग्ण सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असतात नुकतेच एक गंभीर समस्या असलेले पेशंट आले होते त्या पेशंटला ईतरत्र कोणीही दाखल करून घेतले नसते कारण कधी कधी नातेवाईक दाखल करताना हातापाया पडतात कळकळीची विनंती विनवणी करतात – अशा वेळी डॉ दत्तात्रय मुळे यांनी गंभीर पेशंट दाखल करून घेतले व आपले सर्व प्रयत्न/ अभ्यास/ अनुभव पणाला लावून मरणाच्या दारातून बाहेर आणले आणि डॉक्टर अभिनंदनीय ठरले कोरोना महामारीतील सेवा आणि गंभीर पेशंट बरे केले शिवाय सदैव मदतीला धावून जाण्याची तयारी असलेले हे व्यक्तिमत्त्व कोपरगाव तालुक्याचे भुषण ठरले तर नवल नाही म्हणून व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी नारायण शेठ अग्रवाल मयूर इलेक्ट्रीकल चे योगेश जोबनपुत्रा श्री गो विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सी आर बजाज यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला आहे डॉक्टर मुळे परीवाराकडून सदैव अशीच सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना परमेश्वर या परीवारास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभावे हिच सदिच्छा..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *