लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव चा पद्ग्रहन सोहळा दिवाळीच्या थाटात संपन्न..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी लायन्स क्लब व लिओ क्लब च्या पदाधिकाऱ्यांचे पद्ग्रहन करण्यात आले.

यात लायन्स क्लब च्या अध्यक्ष पदी राम थोरे,सचिव पदी अक्षय गिरमे व खजिनदार पदी सुमित भट्टड तर लिओ अध्यक्ष पदी आदित्य गुजराथी,सचिव पदी पृथ्वी शिंदे,आणि खजिनदार पदी ध्रुव कुदळे यांना पद प्रदान करण्यात आले.
या पद्ग्रहन समारंभाला ‘रामराज्य’हे शीर्षक विशेष आकर्षण ठरले. तसेच या समारंभात फुले,रांगोळी,पणत्या,दिवाळीचे फराळ आणि जेवण्यासाठी पुरण पोळी आमटी असा एकंदरित दिवाळी चा माहोल तयार करण्यात आला होता. भगवान श्रीराम अयोध्येत राज्य करण्यासाठी आल्यानंतर राज्यातील लोकांनी जशी दिवाळी साजरी केली होती तसे राम थोरे लायन्स क्लब च्या अध्यक्ष पदी विराजमान झाले म्हणून दिवाळी ही थीम ठेवण्यात आली असे कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख डॉ अभिजित आचार्य यांनी सांगितले. मावळते अध्यक्ष सुधीर डागा यांनी मागील वर्षी केलेल्या सेवा कार्याचे अहवाल वाचन केले.
लायन द्वारकाजी जालन यांच्या हस्ते पद्ग्रहन विधी पार पडला.50 वर्षांची परंपरा असणाऱ्या या क्लब चे तोंडभरून कौतुक केले.
लायन्स चे हे नवीन वर्ष 1 जुलै पासून सुरू झाले असून आत्तापर्यंत डॉक्टर्स डे, सी.ए. डे, कृषी दिन,वृक्षारोपण,निराधांना ताडपत्री वाटप,आशा सेवकांचा सत्कार तर येणाऱ्या काळात ब्लड डोनेशन कॅम्प, वृक्षारोपण,निराधार बालकांना शिक्षण,पाणपोई,असे विविध उपक्रम करण्याचा मानस राम थोरे यांनी व्यक्त केला.
यावेळी लायन म्हणून सोमनाथ सोनवणे,प्रशांत भास्कर,सिद्धेश कपिल,योगेश वरखेडे,तुषार घोडके,सचिन शिनगर,कुणाल घायतडकर,कुलदीप देशमुख,अमित नाईकवाडे,सुमित जगझाप,विशाल जगताप तर लिओ म्हणून रोहित काले, माधव बजाज, हृषीकेश क्षत्रिय,संकेत विसपुते,मल्हार टिळेकर,अंकित कृष्णांनी,प्रणव गुजराथी,श्रेयस लाडे या
नवीन सभासदांना लायन संतोष माणकेश्वर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली.श्रीनिवास पगडाल हे पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.
यावेळी तुलशीदासजी खुबानी,राजेश ठोळे,संदीप कोयटे,सत्येन मुंदडा,संदीप रोहमारे सुधीर डागा, तसेच विजय नानकर,भीमजीभाई पटेल, रवींद्र नेवगे डॉ. विलास आचारी,दिलीप वाबळे,सुरेश शिंदे ,विजय गवांदे,,पंकज ठोळे आदी उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. अभिजित आचार्य व धीरज काराचीवला यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे व प्रसाद भास्कर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *