
कोपरगाव प्रतिनिधी:- भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी जळगाव येथील भारती सोनवणे यांची नियुक्ती झाली .


भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक दादर येथील ‘ वसंतस्मृती ‘ कार्यालयात झाली . या वेळी श्रीमती सोनवणे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले . माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले . प्रदेशाध्यक्ष हंसराज आहिर , राष्ट्रीय उपाध्यक्ष संगमलाल गुप्ता , राष्ट्रीय महामंत्री संजय कुटे , आशिष शेलार , मंगलप्रसाद लोढा , अतुल भातखळकर , महाराष्ट्र भाजप ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर , भाजप प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ , संजय गाते , बापू घडामोडे , वनिता लोंढे आदी उपस्थित होते . श्रीमती सोनवणे यांच्या निवडीबद्दल भाजपच्या येथील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले .
