Uncategorized

सेवा निवृत्ती नोकरीची; नात्याची नाही- आ.आशुतोष काळे ; कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समुहातील निवृत्त कर्मचाऱ्यांना भावनिक निरोप…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहात कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचे नाते केवळ कामापुरते मर्यादित नाही. काळे परिवाराने प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्य मानले आहे. सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा आपण जपली आहे. हीच आपल्या संस्थेची खरी ताकद आणि खरी ओळख आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती ही नोकरीची आहे नात्याची नाही असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील सेवा निवृत्त होणाऱ्या ४१ कर्मचा-यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त कर्मचाऱ्यांचा कुटुंबासह आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या कारखान्याने आणि उद्योग समूहाने आजवर जी प्रगती केली, जे यश मिळवले, जे पुरस्कार मिळवले, त्या प्रत्येक यशामध्ये तुमच्या कष्टांचा, निष्ठेचा आणि प्रामाणिकपणाचा मोठा वाटा आहे. तुमचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद नेहमीच या उद्योग समूहाच्या आणि काळे परिवाराच्या पाठीशी राहिले आहेत. आपणापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी सेवेबरोबरच स्व.माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, माजी आमदार अशोकदादा काळे व मला देखील सामाजिक, राजकीय वाटचालीत मोलाची साथ दिली त्यामुळे मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्ती ही नोकरीची असते; नात्याची कधीच नसते. तुम्ही या कारखान्याचे आणि काळे परिवाराचे अविभाज्य घटक होता, आहात आणि कायम राहाल. या संस्थेचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच खुले राहतील. सेवा संपली असली तरी आपले नाते कायम राहील. यापुढील आयुष्यात आवडी-निवडी जपा, कुटुंबाला वेळ द्या, नातवंडांसोबत खेळत आयुष्याचा आंनंद घ्या.

             या प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रविण शिंदे, संचालक सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, सूर्यभान कोळपे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, शंकरराव चव्हाण,राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, सुरेश जाधव, विष्णु शिंदे, दिनार कुदळे, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने यांचेसह कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, असि.सेक्रेटरी संदीप शिरसाठ, लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह निवृत्त कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे प्रास्तविक सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असि.सेक्रेटरी संदीप शिरसाठ यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे यांनी मानले.

फोटो ओळ-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील कर्मचा-यांचा सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ प्रसंगी कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे, समवेत व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक मंडळ व पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *