अहिल्यानगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन सेमिनार संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक ०५.०७.२०२६ रविवार रोजी सहकार दिनाचे औचित्य साधुन अहिल्यानगर जिल्हा नागरी सह. बँक असोसिएशन कोपरगांव पिपल्स बँक व गौतम सहकारी बँक यांच्या संयुक्त पुढाकाराने नविन डी पी डी पी कायदा व बँकांनी घ्यावायाची काळजी यांवर सेमिनार आयोजित केला.
सदर सेमिनार हॉटेल पाम पॅराडाईड कोपरगांव येथे झाले प्रास्तविक अहिल्यानगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे चेअरमन तथा कोपरगांव पिपल्स बँकेचे संचालक मा.श्री. सत्येनजी मुंदडा यांनी केले.
बँकिंग संगणक तज्ञ श्री रविकिरण मणकीकर साहेब यांनी डीजीटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन २०२३ कायदा व बँकांनी घ्यावायांची काळजी या विषयांवर उपयुक्त माहिती दिली सदर कायद्याची अंमलबजावणी बँकांनी न केल्यास किमान २५० कोटी दंडाची तरतुद आहे असे प्रकर्षाने नमुद केले
श्री दिलीपजी देशमुख सहकारी बैंकिंग तज्ञ यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सहकारी बँका विषयीची भुमिका स्पष्ट केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पालक या नात्यांने सहकारी बँकांना संभाळते याचे विश्लेषण केले सदर कार्यक्रमात कोपरगांव पिपल्स बँकेचे अध्यक्ष श्री सुनिलजी बंब, संचालक श्री सत्येनजी मुंदडा, अतुलजी काले, सुनिलजी बोरा, रविद्रजी ठोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिपकजी एकबोटे आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. संजयजी आगवण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रविणजी पावडे व अधिकारी वर्ग उपस्थित होते. तसेच साई संजीवनी बँक संगमनेर मर्चट बँक अमृतवाहिनी बँक यांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
