४५ते६० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना करोना लसीसाठी चकरा मारायला लाऊ नका:- शरद खरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
अनेक ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे व काहींना पहिला डोस घेयचा आहे. दुसरा डोस व पहिला डोस घेण्यासाठी नागरिक केंद्रावर जात आहे, पण लस उपलब्ध नसल्याने त्यांना माघारी परतावे लागत आहे त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप होत आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी कोवॅक्सिंन पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक केंद्रावर गेले असता, तेथे मात्र कोशिल्डचा डोस उपलब्ध असतो. कोवॅक्सिंन डोस साठी आम्ही तुम्हाला डोस आल्यावर बोलून घेऊ अशी उत्तरे मिळता, त्यामुळे बहुसंख्या ज्येष्ठ नागरिक निराश होऊन पुन्हा घरी येतात. त्यांच्या येण्या जाण्याच्या प्रवासात केंद्रावर झालेल्या गर्दीत कुणाला दुर्देवाने त्याची कोरोनाची लागण झाली तर, नाहक ज्येष्ठ नागरिक त्याचे बळी पडतील.

तसेच काही आरोग्य केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना डावलून, १८ते४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे प्रकार सुरू आहे. वास्तविक पाहता नवीन जीआर प्रमाणे १८ते४४ वयोगटातील नागरिकांना लस देणे मुळातच नियम बाह्य आहे, कारण या वयोगटातील नागरिकांची पोरटल वर नोंदच होत नाही.
मग असे असताना देखील या वयोगटातील नागरिकांना लस कशी दिली जाते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना लसीकरणापासून वंचित रहावे लागत आहे.
तरी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी हा सावळा गोंधळ लवकरात लवकर थांबवावा व अशा नोंदणीकृत लोकांना लसीकरण केंद्रावरून फोन करून बोलवावे तसेच ४५ते६० वयोगटातील सर्व सामान्य नागरिकांना न्याय द्यावा तसेच लसीचे डोस वाढून घ्यावे, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे मा. जिल्हाध्यक्ष व सल्लागार शरद खरात यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रका द्वारे केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *