
कोपरगांव प्रतिनिधी:-
गेल्या एक दिड वर्षापासुन कोरोना चे संकट देषासह, महाराष्ट्रात आले आहे, कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना राबवित आहे, कोपरगाव मतदारसंघात देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तिस-या लाटेचा विचार करता कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी विद्यामान आमदारांनी सर्व पक्षीय बैठक आयोजित करावी अषी मागणी कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जीव घेणी असल्याने सर्व नागरिक भयभीत झालेले असुन रुग्णांना भितीच्या वातावरणातुन व संकटातून बाहेर पडण्यासाठी विशेष उपाय योजना राबविण्याची गरज आहे. आज अखेर कोपरगांव मतदारसंघात 11 हजार पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णांवर उपचार घेत आहे. आजही मतदारसंघात कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड, इंजेक्शन औषधे आदि सुविधा वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांबरोबर नातेवाईकांना देखील अनेक समस्यांना आजही तोंड द्यावे लागत असल्याने प्रषासन देखील हतबल झालेले आहे त्यातील दुसरी बाजु अषी आहेत की, महसुल, पोलीस, नगरपरिषद, वैद्यकीय विभागास अनेक कर्मचारी यांची संख्या कमी असतांना देखील प्रषासकीय अधिकारी रात्र दिवस काम करुन आपली जवाबदारी पार पडत आहे तर जवाबदारी पार पडत असतांना अनेक कर्मचारी, अधिकारी कोरोना बाधित झालेले असले तरी त्यांनी आपले पाऊले मागे न घेता पुढे पाऊले टाकत आहे. मतदार संघातील कोरोनावर नियंत्रण आणण्याची खरी वेळ आता सर्वांवर आलेली आहे यासाठी सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, संघटना एकत्र येवुन , उपाय योजनांचे नियोजन करुन कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी विद्यमान आमदार यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवुन सदर बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व सदस्य, नगरसेवक, पोलीस पाटील, यांना देखील बोलविण्यात यावे अशी मागणी देखील विवेक कोल्हे यांनी केली आहे.
