कोपरगाव मतदारस संघाच्या पूर्व भागातील दोन नव्या १५ कोटीच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात नागरीकांमध्ये समाधान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी रस्ते हा महत्वाचा दुवा असलेल्या रस्त्यांसाठी आ.आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीतून माध्यमातून सावळीविहीर-सडे-वारी आणि सवंत्सर-कान्हेगाव-वारी रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून मागील अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून मतदार संघातील असंख्य विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवला आहे. या निधीतील सावळीविहीर-सडे-वारी या ५ किमी रस्त्याच्या कामासाठी ५ कोटी तर संवत्सर-कान्हेगाव-वारी या ९ किमी रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणत आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील या महत्वाच्या रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.

सावळीविहीर-सडे-वारी आणि संवत्सर-कान्हेगाव-वारी या दोन मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असल्याने परिसरातील नागरिकांचा दळणवळणाच्या अडचणी दूर होणार आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी महायुती सरकारकडे सतत पाठपुरावा केला असून त्यांच्या पाठपुराव्याचे हे फलित आहे.
या दोन्ही रस्त्यांचे काम दर्जेदार आणि पारदर्शक पणे पूर्ण होऊन शेतकरी, दूध व्यावसायिक, शाळेत जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करून पूर्णत्वास नेला आहे. केवळ रस्ते बांधणे महत्त्वाचे नसून ते दीर्घकाळ टिकणारे आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे. याकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यांच्या कामात लक्ष घालून चांगल्या पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे. महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचवली असल्याने नागरिक समाधानी आहे.

चौकट – कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या वारी येथील गोदावरी नदीवरील पुलाचा मागील चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी २० कोटी रुपये निधी देवून सोडविला आहे.या पुलाचे काम अंतिम टप्यात असून पूर्व भागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी कायमच्या निकाली निघाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *