
कोपरगाव प्रतिनिधी:-
आपण सर्वजण मागील 1 वर्षांपासून कोरोनाच्या महाभीषण संकटाचा सामना करत आहोत. आपल्या कोपरगावला कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेने दुसऱ्या लाटेचा फटका जास्त बसला आहे. परंतु इतके रुग्ण असतानाही इतर ठिकाणांपेक्षा कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना झळ कमी बसली आणि त्याचे श्रेय जाते ते आमदार आशुतोषदादा काळे यांना. आशुतोषदादांची दूरदृष्टी आणि योग्य नियोजनामुळे कोपरगाव तालुक्यात वैद्यकीय सुविधा लवकर उपलब्ध होऊ शकल्या व आपण नागरिकांचे प्राण वाचवू शकत आहोत. आशुतोषदादांच्या प्रयत्नांमुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांसाठी 500 बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर, 100 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर व ऑक्सिजन रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.
आशुतोषदादांनी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे सुरू केलेल्या कोविड सेंटरमुळे अनेक रुग्ण मोफत उपचार घेऊन बरे होऊन आपल्या घरी सुखरूप जात आहेत. या कोविड केअर सेंटरची जबाबदारी दादांनी माझ्या खांद्यावर दिली ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. एवढे मोठे काम पेलने खरच सोपे काम नव्हते. परंतु दादांचा माझ्यावरचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी हवे ते सर्व प्रयत्न करत आहे व या सगळ्यामध्ये मला माझे सहकारी व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
सुरुवातीला जेव्हा कोरोना पेशंट कोविड केअर सेंटरमध्ये ऍडमिट होतात तेव्हा ते खुप घाबरलेले असतात पण जेव्हा औषधोपचार झाल्यानंतर जेव्हा पेशंट समाधानी मनाने आशुतोषदादांना आशिर्वाद देत घरी जातात त्यावेळी खरच आपण काहीतरी चांगलं काम करतोय याचं आत्मिक समाधान मिळते आणि हे समाधान आणखी रुग्णांची सेवा करण्याची ऊर्जा देऊन जाते.
आशुतोषदादा करत असलेले समाजकार्य शब्दात न मोजता येणासारखे आहे आणि या कार्यात माझाही कुठेतरी खारीचा वाटा आहे ही गोष्ट माझ्यासाठी खुप अभिमानास्पद आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य व आशिर्वाद असेच मिळत राहो हीच यानिमित्ताने सदिच्छा..!!
- आपलाच
अनिरुद्ध काळे…
