

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव वार्ताहर :-कोपरगाव तालुक्यामध्ये विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक व स्थानिक आदिवासी बांधवांनी एकत्रित येत सकल आदिवासी समाज कोपरगाव यांच्यामार्फत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळेस लहान मुल मुली, महिला भगिनी- पुरुष यांची उपस्थिती लक्षणीय होती. जागतिक आदिवासी दिन साजरा करताना प्रथम कोपरगाव नगर परिषदेने सुमारे दोन कोटी खर्च करून उभारलेले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बाजारओटे येथील फलकाचे पूजन सकाळी दहा वाजता करण्यात आले. त्यानंतर एकलव्य आदिवासी आश्रम शाळा टाकळी येथील 400 विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. संध्याकाळी झालेल्या प्रतिमापूजन कार्यक्रमादरम्यान योग भवन ,भाग्यनगर येथे सर्व आदिवासी बांधवांनी एकत्रित येत जागतिक आदिवासी दिन साजरा केला. यामध्ये आदिवासी बांधवांना च्या मुलांनी क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच आदिवासी संस्कृती जोपासणारे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व आदिवासी साहित्यिक व कवी श्री. संजयजी साबळे सर यांचे “आदिवासींचा लपवलेला इतिहास ” यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. यावेळेस त्यांनी -” आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या एकाच कुटुंबातील पाच लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली. ही स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रजांना प्रतिकार करण्याकरतांना घडलेली पहिलीच घटना आहे. त्याचबरोबर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना पकडण्यासाठी पाच प्रांताचे रेजिमेंट व नगर जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा कामाला लावली होती .यावरून राघोजी भांगरे यांनी केलेल्या कार्याची पावती मिळते. आदिवासी समाजाचा इतिहास नेहमी देशाप्रती समर्पित राहिलेला आहे .” असे आपले व्याख्यानात सांगून ते पुढे म्हणाले की ” इंग्रज भारतात आल्यानंतर सर्वात प्रथम देशद्रोहाचा खटला भरला ते रामजी भांगरे यांच्यावरच.

इंग्रज भारतात आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काळ्या पाण्याची शिक्षा झाली ते रामजी भांगरे यांना.
इंग्रज भारतात आल्यानंतर सर्वात प्रथम फाशी झाली ती रामाजी भांगऱ्यांना.
इंग्रजांविरुद्ध सर्वात प्रथम सशस्त्र उठाव केला तो रामजी भांगऱ्यानी.
त्यानंतर जवळ-जवळ २५ वर्षानंतर जन्म झाला तो वासुदेव बळवंत फडके यांचा तरी सुद्धा आद्यक्रांतीकारक म्हणून इतिहासात नोंद कशी…?
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांना पकडण्यासाठी त्या काळात रोख ५००० रुपयाचे बक्षिस होते त्या काळाचे ५००० हजार म्हणजे आताचे ५० कोटी .

इंग्रजांनी जगात अनेक देशात राज्य केले पण आपल्या राजाची म्हणजेच इंग्लंडच्या राजाची तुलना त्यांनी संपूर्ण जगात कोणत्याच व्यक्तिशी केली नाही पण संपूर्ण जगात त्यांनी एकाच माणसासी आपल्या राजाची इंग्लंडच्या राजाची तुलना केली ते म्हणजे जून्नरचे सुपुत्र लॉयन हार्टेड होनाजी केंगले.
हा आदिवासी क्रांतीकारकांचा जाज्वल इतिहास कधीच जनते समोर आला नाही किंवा येऊन दिला नाही
जगात अनेक धर्म आहेत पण प्रत्येक धर्माचे संस्थापक हे पुरुष आहेत मात्र फक्त आदिवासी संस्कृती ही महिलांनी निर्माण केली आहे….”
हा आदिवासींचा लपलेला इतिहास समाजासमोर आणला. असे आपले जोश पूर्ण भाषणातून सांगितले. यावेळी जेष्ठ कलाशिक्षक सुभाषजी चारुडे सरांचं आदिवासी कलाकृतींचे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. दोनशे पेक्षा जास्त चित्र कला कृती पाहून सर्वांनी उत्कृष्ट कलेबद्दल दाद दिली. यावेळी सुरुची भोजनानंतर आदिवासी नृत्यांचा सर्व महिला – पुरुष यांच्यासह लहान बालकांनी सुद्धा आस्वाद घेतला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिपक भोये सर, संचालक,रयत शिक्षक बँक सातारा,ज्येष्ठ शिक्षक महारु चव्हाण सर ,कृषी अधिकारी ज्ञानदेव ठाकरे साहेब, आदिवासी समाजाचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे साहेब ,ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब साबळे सर ,सोमनाथ दिघे सर हे होते. यावेळी प्रास्ताविक शिवाजी वळवी सरांनी केले तर सूत्रसंचालन निखिल सलामे सर व सुनील पोरे यांनी केले .आभार नंदकुमार जोपळे सरांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण चौरे, होबेल गावीत, राजू गावीत,गांगुर्डे सर, बाळू दिघे ,गोविंद आढळ ,सुनील पोरे,मारुती भोईर, दिपक तुंगार ,अशोक शिंदे, शरद शिंदे, संजय साबळे, कोकणी, काळू मुठे, विलास महिरे इत्यादींनी मेहनत घेतली.
