
कोपरगाव प्रतिनिधी:-
आद्य समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची रविवार, दि.११ एप्रिल २०२१ रोजी १९४ वी जयंती साजरी होत आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने विविध सामाजिक उपक्रमातून आपल्या शहरातील तसेच गावातील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळा किंवा प्रतिमेला अभिवादन सोशल डिस्टन्सचे पालन करत महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात यावी,वेळ स १०वा तसेच २मि थोडक्यात आपले महात्मा फुले जीवनवरील व्हिडीओ काढुन सोशल मिडिया वर शेयर करावा
असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब करडक यांनी केले आहे.
आपल्या तालुक्यातील अध्यक्ष यांच्या कडुन माहिती घेणे.
