विकासकामांच्या बाबतीत आ. आशुतोष काळेंच्या मागे हिमालयाप्रमाणे उभा:- ना. हसन मुश्रीफ…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावच्या सुज्ञ मतदारांनी आ. आशुतोष काळे यांना विधानसभेत पाठवल. राज्याचा ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्याशी अनेक वेळा भेट झाली. प्रत्येकवेळी त्यांची विकासाची तळमळ पाहून त्यांना आजवर २५१५, ३०५४ व जिल्हा नियोजन समितीतून सर्वात जास्त निधी दिला असून कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासकामांच्या बाबतीत आ. आशुतोष काळेंच्या मागे हिमालयाप्रमाणे उभा आहे असे प्रतीपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांनी कोपरगाव येथे केले.

कोपरगांव येथे उपजिल्हा रुग्णालयात ५० बेडचे अतिरिक्त कोविड हॉस्पिटल व ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार विजय बोरुडे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम,धरमचंद बागरेचा उपस्थित होते.

     पुढे बोलतांना ना. मुश्रीफ म्हणाले कि,कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत देशाची,राज्याची व अहमदनगर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत जिल्हा आघाडीवर होता. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत हा त्रास सहन करावा लागू नये त्यासाठी ऑक्सिजन प्लांटची संख्या वाढविणे गरजेचे होते त्यामुळे जिल्ह्यतील १४ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व ओषध उपचारासाठी १०० कोटी खर्च केले. जिल्हा नियोजन मंडळाच्या ३० टक्के रक्कम खर्च करून कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले. साईबाबा संस्थानवर पूर्ण विश्वस्त मंडळ नेमणूक न केल्यामुळे कारभार करण्यास उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे मात्र साईबाबा हे संकट लवकरच दूर करतील अशी आशा व्यक्त केली. आ. आशुतोष काळे हे निष्कलंक चारीत्र्य असून त्यांच्या हातून संस्थांनच्या प्रत्येक पैशाचा भक्तांसाठी व परिसराच्या विकासासाठीच उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले  

दोन दिवसांनी मुख्यमंत्री सडक योजनेचे वाटप होणार आहे. यातील जास्तीत जास्त रस्ते आ. आशुतोष काळे यांना देणार आहे. आजपर्यंत जिल्हा नियोजन मधून जास्तीत जास्त निधी कोपरगाव मतदार संघाला दिला असून यापुढे देखील जास्तीत जास्त निधी देणार असल्याची ग्वाही ना. हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली. यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले कि,

 मतदार संघातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आदरणीय पवार साहेब यांच्या विकासाच्या विचारावर विश्वास ठेऊन मला निवडून दिले. मतदार संघात मागील ५ वर्षात विकास कामे न झाल्यामुळे विकास कामांचा मोठा अनुशेष बाकी होता. तालुक्यातील रस्ते व विविध पायाभूत सोयी सुविधा यासाठी निधी उपलब्ध करणे व विकास कामे सुरु करणे माझ्या पुढे मोठे आव्हान होते. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफ तसेच सर्वच विभागाच्या मंत्री महोदयांचे मोठे सहकार्य मिळाले. त्यामुळे कोपरगांव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागाचा विकासाची आश्वासक सुरुवात करणे सहज शक्य झाले. भविष्यात उर्वरित विकास कामांचा निपटारा करण्यासाठी मतदार संघातील जिव्हाळ्याचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांचीच मदत होणार असून मतदार संघाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कोपरगाव तालुक्यातील १०० टक्के लसीकरण झालेल्या हंडेवाडी, बक्तरपूर, खोपडी व डाऊच बु. चार ग्रामपंचाययोचे पदाधिकारी आरोग्य सेवक यांचा ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लवकरच संपूर्ण कोपरगाव तालुका १०० टक्के लसीकरण पूर्ण करणार असल्याचा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कारभारी आगवन, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, युवती तालुकाध्यक्ष सौ. वैशाली आभाळे, जिल्हा सचिव सौ.रेखा जगताप, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, राष्ट्रीय युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तुषारजी पोटे,तालुका आरोग्याधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. सौ. वैशाली आव्हाड सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते.

चौकट :- निर्गवी, अजातशत्रू, स्वभावाने सोज्वळ व विनयी स्वभावाचे आ. आशुतोष काळे यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व आदरणीय पवार साहेबांनी दिलेली साईबाबा संस्थानची जबाबदारी समर्थपणे पार पडतील.कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देणार असून पाच वर्षात विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही-
ना. हसन मुश्रीफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *