कोरोना रुग्णांना माळी समाजाच्या वतीने थोडा का होईना दिलासा..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव माळी समाजाच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी लागणारे औषधे व इतर साहित्य आज कोपरगाव ग्रामीण रुग्णालयचे अधीक्षक डॉ . कृष्णा फुलसौंदर यांच्याकडे सुपूर्द केले. या मदती बद्दल डॉ. फुलसुंदर यांनी माळी समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.
सध्या सगळ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही मोठ्या प्रमाणात झाला आहे . त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे . अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे अत्यावश्यक वस्तूंचा आणि औषधांचा तुटवडा भासत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, औषधे वेळेवर मिळेनाशी झाली आहे. हि गरज ओळखून कोपरगाव माळी समाजाने आपल्या समाजाचा वतीने रुग्णांसाठी अत्यावश्यक वस्तूची खरेदी करून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक कृष्णा फुलसुंदर यांच्याकडे सुपूर्द केले , यामध्ये सलाईन २ हजार ,१०० अनॉक्सिपिरिन इंजेक्शन , ४९ ऑक्सिजन मास्क आणि बॅग ,१० बॉक्स ग्लोज , १ हजार साधे मास्क आदी वस्तूंचा त्यात समावेश होता .

यावेळी उपस्थितांनाही आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले कि आपल्या माळी समाज बांधवांनी केलेल्या विशेष सहकार्यामुळे सदरचे औषधे रुग्णांपर्यंत पोहचणार आहेत. असेच सहकार्य आपल्या समाज बांधवांनी वेळोवेळी गरजु रुग्णांसाठी केले तर निश्चितच कोरोना कालावधीतील विशेष योगदान हे माळी समाजाचेच असेल. आपल्या कष्ट आणि चिकाटीमुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती करणारा देशावर परकीय संकट किंवा कोरोना सारखे जागतिक महामारीचे संकट असो अशाच प्रकारे सतत देशाला गरज पडेल तेव्हा माळी समाज मदतीसाठी तत्पर असेल . यावेळी अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचप्रमाणे कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी सर्वानी नियम पाळावे असे आवाहनही केले . या मदतीचे वैशिष्ठ म्हणजे या मदतीचा कोणताही गवगवा नाही, बातमी नाही,मदत करणाऱ्या व्यक्तींचे भाषण नाही किंवा कोणाचे नावही मिरवायला नाही. यालाच म्हणतात एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू न देणे होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *