कोपरगाव येथील शुक्राचार्य महाराज यांच्या मुर्तीची शुक्राचार्य मंदिर बेट येथे स्थापना…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 13/02/2023 वार सोमवार रोजी गुरू शुक्राचार्य महाराज यांचे ” शुक्र तीर्थ ” एका ऐतिहासिक उपक्रमाचे साक्षीदार झालेले आहे , आज रोजी मंदिरात प्रथमच गुरू शुक्राचार्य महाराजांच्या आत्यंतिक सुंदर अश्या प्रतिमांचे ( मूर्ती ) चे आगमन मंदिरात झाले आहे . सर्व प्रथम महाराज्यांच्या प्रतिमेची पूजा श्री परगजी संधान साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आली , या नंतर प्रतिमांची भव्य मिरवणूक बेट भागात पालखी मार्गावरून काढण्यात आली, प्रतिमा मंदिरात आणल्या नंतर त्यांची रीतसर पूजा मंत्रोपच्यारात व अत्यंत धार्मिक पद्धतीने माननीय श्री विवेक भैया बिपिन दादा कोल्हे पा ( चेअरमन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सह साखर कारखाना ) यांचे शुभ हस्ते करण्यात आली . व मूर्तींची स्थापना नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या “अभिषेक” कक्षात करण्यात आली . नंतर महाराजांची आरती करण्यात आली .


या शुभ प्रसंगी उपस्थित राहून उपक्रमाला शोभा वाढवत आम्हाला योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल माननीय श्री विवेक भैया कोल्हे पा यांचा यथोचित सन्मान ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवर श्री विवेक भैया , श्री पारागजी संधान , श्री अनिल सोनवणे , श्री शंकरराव वाणी , श्री सिद्धू शेळके , श्री किरण सुपेकर , श्री दादा नाईकवाडे , श्री डी एन आव्हाड सर , श्री भाऊसाहेब शिंदे , श्री बाळासाहेब जंगले , बरोबरच मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड ,ट्रस्टी श्री हेमंत पटवर्धन, मंदीर प्रमुख श्री सचिन परदेशी , उपमंदिर प्रमुख श्री प्रसाद पऱ्हे , श्री संजय वाडांगले , विलास अप्पा आव्हाड , मुन्ना आव्हाड , भागचंद रुईकर , आदिनाथ ढाकणे , दिलीपराव सांगळे , मधुकर साखरे , विजय रोहोम , बाळासाहेब लकारे , विशाल राऊत , विकास शर्मा , महेंद्र नाईकवाडे , व्यवस्थापक राजाराम पावरा , मंदिरातील पुजारी , कर्मचारी वृंद , व असंख्य शुक्राचार्य भाविक भक्त गण उपस्थित होते . गुरू शुक्राचार्य महाराजांचे प्रतिमेच्या रुपात पहिल्यांदाच मंदिरात आगमन झाले बद्दल सर्व भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी करून आनंद व समाधान व्यक्त केले . या बद्दल मंदिर प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल सर्वांनी कौतुक केले . या प्रसंगी पाहुणे श्री विवेक भैया कोल्हे यांनी समाधान व्यक्त करत या पुढे मंदिरा संदर्भातील सर्व कामात कायम तुमच्या सोबत ” मी आहे ” असे आश्वासन दिले .
या प्रसंगी सर्वांनी सहकार्य केल्या बद्दल देवस्थान ट्रस्ट चे वतीने आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *