

कोपरगाव प्रतिनिधी:-
शिर्डी साईबाबांच्या पावनभूमीमध्ये नाभिक समाजाचा राज्यस्तरीय वधु वर मेळावा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात साजरा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान अण्णा बिडवे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते दशरथ भाऊ तुपे यांनी केले कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्वच भागातून समाज बांधव मोठे प्रमाणात उपस्थित होते. वधु वर मिळून 700 बायोडेटा नोंदणी झाली कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच महाराष्ट्रातील समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असे माहिती वधू-वर पालक परिचय मेळावा समितीचे आयोजक व राष्ट्रीय नाभिकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ सुनील भाऊ गायकवाड आनंद भाऊ बिडवे संजय भाऊ जाईबहार अशोक भाऊ कोरडे सागर भाऊ अहिरे.सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी भरभरून प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.


