
कोपरगाव प्रतिनिधी:-
अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण मोहीम गतिमान करायची असेल तर बळी जाऊन नाही तर बळ देऊन साथ द्यावी असे आवाहन हनुमंत ताकतोडे यांनी केले
अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे या मागणीसाठी बीड येथील स्व संजय ताकतोडे यांनी शासनाचा निषेध करत जलसमाधी घेतली होती त्यांच्या स्मृती दिना निमित्ताने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण लढा गतिमान करण्यासाठी दि ५ मार्च रोजी साळेगाव ता केज येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या निमित्ताने हनुमंत ताकतोडे यांनी कोपरगाव येथे भेट देऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले
या वेळी बोलताना हनुमंत ताकतोडे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती समूहातील आरक्षण लाभ वंचित जाती आरक्षण वर्गीकरण व्हावे अशी मागणी करत आहे मात्र ही मागणी करूनच माझा भाऊ स्व संजय ताकतोडे यांनी जल समाधी घेतली मात्र त्यात माझ्या भावाचा बळी गेला असला तरी आता समाजातील या लढ्यात सहभागी होऊन बळ देणे आवश्यक आहे
या वेळी बोलताना लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ म्हणाले की लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक मा प्रा रामचंद्र भरांडे यांनी आरक्षण वर्गीकरण लढा गतिमान करण्यासाठी दहा लाख सह्यांचे निवेदन द्यायचे ठरवले आहे या पूर्वी मर्यादीत स्वरूपात असलेला लढा गतिमान करण्यासाठी अनुसूचित जातीतील मातंग समाजा बरोबरच मादगी,मेहतर,मोची, ढोर, डक्कलवार आशा वंचित जातींना सोबत घेतले आहे तसेच अन्य राज्यांनी केलेल्या मागणी प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने या मागणीस अनुकूलता दर्शवली आहे सरकारवर दबाव टाकल्या शिवाय व अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण याचे जनआंदोलन उभारल्या गती मिळणार नाही
यावेळी भाजप अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे म्हणाले की आम्ही या विषयावर समाज बांधवांनी केलेली मागणी केंद्र सरकार कडे मांडू यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहुजी टायगर सेनेचे संस्थापक शरद त्रिभुवन यांनी केले तर आभार सोमनाथ म्हस्के यांनी मांडले
यावेळी नगर येथील उमेश साठे, आष्टी येथीलमा.हानुमंत ताकतोडे, मा.उमेश साठे, मा.नागेश डाडर, मा.सचिन गालफाडे आदी उपस्थित होते.
