नेमकं मुर्ख कोण? कोपरगाव चे नागरिक का राजकारणी:- सतिष काकडे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुक्यात एकचं विषयावर चर्चा सुरू आहे ती म्हणजे
वाढिव लाईट बिल व महागाई
परंतु चर्चा करतात
फक्त आप आपसात किंवा व्हाॅट अप वर
पण
प्रत्यक्षात रस्त्यावर उतरायची गरज असतांना देखील घरात बसुन बाता करण्यात कोपरगावाचे नागरिक शहाणपण दाखविण्यात हुशार झाले आहे.
याचा अर्थ
तुम लढो हम कपडे संभालते है
एक तर
निवडणुकीत ५०० रुपये घेऊन आपण आपला शहाण पणा सिध्दचं केलेला आहे.
त्या ५०० रुपया मुळे
कोपरगाव शहर व तालुक्याचे विकास कामाला आपणचं कारणी भुतं आहे
परंतु आता किमान ज्या आपल्या प्रश्नासाठी जे राजकिय मंडळी ज्यांना आपण ५०० रुपये घेऊन केंद्रसरकार मध्ये बसवले
तसेच ज्यांच्या कडुन देखिल ५०० रुपये घेऊन ज्यांना राज्य सरकार मध्ये बसविले भाजप , शिवसेना, काॅग्रेस , राष्ट्रवादी
पक्षाचे नेते पदाधिकारी
आणि
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
विषय जेथे गंभिर,,, मनसे तेथे खंबीर!
या अनुषंगाने सदैव जनतेच्या पाठिशी खंबिर उभी तर आहेचं
तर मग
नागरिकांचे देखील कर्तव्य आहे ना कि जो कोणी आपले प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो,अमरण उपोषण करतोय, वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांना नडतो आणि आपल्या मुलभूत प्रश्नासाठी लढतो त्या कोणत्याही पक्षाच्या मागे एक सामान्य नागरिक म्हणुन
खंबीर पणे का उभा राहु शकत नाही ?
वाढिव लाईट बिल भरण्यासाठी जन आंदोलन करणाऱ्या एक महिला असुन देखील रस्त्यावर उतरुन जनतेच्या हितासाठी लढु शकतात,
मगं फक्त
भाजप वाल्यांना किंवा मनसे वाल्यांनाचं वाढिव बिले आलेले नाही.
तर संपुर्ण कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांना साठी हा मोर्चा होता मगं जनता या मोर्चात सहभागी का झाली नाही ?
त्याच बरोबर
राज्यात सरकार असणाऱ्या शिवसेनेच्या वतीने पेट्रोल , गॅस , डिझेल च्या महागाई विरोध तहसील कार्यालयावर मोर्चा काढला तो देखील नागरिकांनसाठीचं ना?
मगं फक्त
शिवसेनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना पेट्रोल गॅस डिझेल महाग आहे असे तर काही नाही ना?
मग
कोपरगाव चे नागरिक त्याच्या मोर्चा मध्ये का सहभागी झाले नाही?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तर नगर जिल्ह्यातील नाही एवढे आंदोलने कोपरगाव शहर व तालुक्यात केले असतील सहभागी होणे तर सोडा कधी कौतुकाची थाप देखील नाही
अपेक्षा पण नाही कारण ,! आम्ही जे करतोय ती जनतेची सेवा व राजसाहेब ठाकरे यांची शिकवण व आदेशाचे पालन आहे
पण बरोबर
राष्ट्रवादी चे आमदार साहेब , पदाधिकारी कार्यकर्ते अनेक आंदोलन करतात, कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती
, स्वराज्य जनआंदोलन , पत्रकार , न्युज रिपोर्टर बांधव
अनेक समाज संघटना
समाज सेवक
असे अनेक जन
आप आपल्या पध्दतीने जनतेची प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात
त्याच प्रमाणे
जनतेचे पण कर्तव्य
आहे हि
आपणही या सर्वांन बरोबर कमीतकमी आपल्या प्रश्नासाठी तरी पक्ष नेते न बघता परीवार बघुन त्याच्या पाठिशी खंबिर उभे राहिले पाहिजे
कारण ५०० रुपयांत आपण आपले मतदार केल्या मुळे ५ वर्षा ची आपली किंमत ठरवली आहे.
आणि त्याच
गोष्टीचा ते पुरेपुर फायदा घेत असतात
तर आज वेळ आहे कि
आपण त्यांचा फायदा आपल्याला परीवारासाठी आपल्या मतलबासाठी घ्यायचा आहे.
केंद्रातले म्हणतात वाढिव लाईट बिल माफ करा
राज्यातील म्हणतात पेट्रोल गॅस डिझेल दर कमी करा
पण
मनसे म्हणते
तुम्ही दोघे मिळुन जनते साठी काही तरी करा
कारण
नागरिकांना मर्खात काढण्या पेक्षा
आपण एक जण केंद्रात आहे
तर
दुसरे राज्यात सत्तेत आहे हे विसरु नका
आम्हाला हेचं समजत नाही कि कोण कोणाला मुर्ख समजतोय
नागरिकांनी आंदोलकांना मुर्खात काढले
कि
सत्तेत असुन आंदोलन करुन नागरिकांना मुर्खात काढाले
मगं तुम्हिचं ठरवा
खरे मुर्ख कोण?
कोपरगाव ची जनता कि राजकारणी…
सतिश आण्णा काकडे
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
गिताई प्रतिष्ठान कोपरगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *