माजी समाजकल्याण मंत्री शिवसेना नेते बबनराव घोलप यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोपरगावच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे शहरात क्रांतिकारी नेते माजी मंत्री शिवसेनेचे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या वाढदिवसा निमित्त कोपरगाव शहर व तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मुकबधीर विद्यालय कोपरगाव येथे विद्यार्थ्यांना फळांचे व खाऊचे वाटप करण्यात आले
कोकमठान येथील गोकुळधाम गोशाळेत गायींना हिरवा चारा दान करुन बबनराव घोलप यांच्या निरोगी व उदंड आयुष्या करीता प्रार्थना करण्यात आली
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागाचे अध्यक्ष दिलीपराव कानडे यांच्या नेतृत्वाखाली व समाजातील जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी मनोगत व्यक्त केले व माजी मंत्री घोलपनाना यांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थिताना करून दिली व शुभेच्छा दिल्या
यावेळी समाजातील जेष्ठ राष्ट्रीय चर्मकार महासंघ राज्यकार्यकारनी सदस्य एम डी कानडे,माजी तहसीलदार डी आर दुशिंग,कोपरगाव तालुका अध्यक्ष माधवराव पोटेसर, देविदास कानडे, जिल्हा सचिव संजय पोटे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग , शहर अध्यक्ष गणेश कानडे,राकेश धाकतोडे, योगेश मगर ,संकेत कानडे ,भाऊसाहेब कानडे, संतोष कानडे, सागर पोटे,रघुनाथ लोहकरे यांचे सह समाज बांधव तसेच मुकबधीर विद्यालय चे सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *