के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी रोहन यादव यास विज्ञान शाखेचे पेटेंट…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी रोहन यादव यास ‘सोलर पॉवर्ड अल्‍ट्रासोनिक हनीबी पेस्ट रिपलंट डीवाइस’ या विषयात पेटेंट मिळाल्याबददल श्री. साईबाबा संस्थान, शिर्डीचे अध्यक्ष व कोपरगाव तालुक्याचे आमदार मा. ना. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते त्यास सन्मानित करण्यात आले. रोहन हा महाविद्यालयातील बी.एस्सी व एम.एस्सी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारा विद्यार्थी असुन सध्या तो प्राणीशास्त्र विभागात पी.एचडी.चे शोधकार्य पूर्ण करत आहे. रोहन याचे आतापर्यंत अनेक रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेले असुन त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे इन जिनियस पॅन्सालिटी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मॅजेस्टर युनिव्हर्सिटी लंडन या विद्यापीठाने त्याला संशोधन कार्यासाठी आंमत्रित केलेले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण 20 पेक्षाही अधिक सेमिनार मध्ये शोध प्रप्रत्राचे वाचन व सहभाग नोंदविलाला आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय अविष्कार-२०१७ मध्ये विभागीय पोष्टर प्रस्तुतिकरणामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणुन मधमाशी पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मधमाशी ही फुलातील रसाला/परागांना मधात बदलविते व त्यास आपल्या पोळ्यात जमा करते. जंगलातून व इतर ठिकाणांहून मध गोळा करण्याची फारच प्राचीन परंपरा आहे. बाजारात मधाच्या मागणीस वाढता प्रतिसाद बघता मधमाशी पालन हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती देणारा उद्योग आहे. हा व्यवसाय करतांना व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. या पेटेंटच्या माध्यमातून या व्यवसायावर व मधमाश्यांवर होणाऱ्या वाईट परिणामावर आळा बसणार आहे. सदर पेटेंट हे महाविद्यालयातील विज्ञान शाखेत मिळालेले पहिले पेटेंट असुन त्याने मिळविलेल्या या अद्भुतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजिवदादा कुलकर्णी, विश्वस्त संदिप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, रजिस्‍ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. रोहनने विद्यार्थीदशेत मिळविलेल्या या पेटेंटमुळे कोपरगांव पंचक्रोशीतुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *