
कोपरगाव प्रतिनिधी नाशिक:-
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदी येवला अंदरसुल येथील संतोष खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथील कार्यालयात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ, सचिन कळमकर, प्रकाश बागल आदी उपस्थित होते.
संतोष खैरनार यांनी येवला ग्रामीण मधून विविध वर्तमान पत्रातून बातमीदार म्हणून कामकाज केले आहे. तसेच आजही ते विविध वर्तमान पत्रातून मुक्त पत्रकार म्हणून काम करत आहे. गेल्या वीस वर्षांपासून संस्थापक अध्यक्ष मा ना छगनरावजी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले समता परिषदेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत असून आज त्यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
