संजीवनीमुळे विध्यार्थी बनताय १९ व्या वर्षी कुटूंबाचा आधार...
कोपरगांव प्रतिनिधी:-
मागील महिन्यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने मायडिया इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या अंतिम वर्षातील विध्यार्थ्यांच्या घेतलेल्या परीसर मुलाखतींचे निकाल जाहिर केले असुन यात या कंपनीने तब्बल ४० नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. हे सर्व विध्यार्थी ग्रामिण भागातील असुन संजीवनीच्या प्रयत्नामुळे तसेच विध्यार्थी व त्यांच्या पालकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आज ते वयाच्या १९ व्या वर्षीच कुटूंबाचा आधार बनत आहे, ही बाब संस्थेबरोबरच विध्यार्थ्यांच्या पालकांसाठी खुप महत्वपुर्ण आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की मायडिया ही कंपनी १८० देशात कार्यरत आहे. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युट्सचे संस्थापक कै. शंकरराव कोल्हे यांनी ४० वर्षांपूर्वी ज्या हेतुने या पाॅलीटेक्निकची स्थापना केली होती, तो हेतु विविध नामांकित कंपन्यांमध्ये विध्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोकऱ्यामुळे पुर्ण होत आहे.
अलिकडेच मायडिया जाहिर केलेल्या नेमणुकांमध्ये अंतिम वर्षातील श्रेयश अशोक वढने, योगेश कन्हैयालाल रावळ, देवेंद्र राजेंद्र साळवे, प्रसाद अरविंद चव्हाण, प्रज्वल राधाकिशन दवंगे, ओमकार नारायण बडाख, श्रीकांत गणेश महाले, ऋषिकेश सुदाम बोरकर, अजय नानासाहेब मोरे, ऋषिकेश शंकर पेराणे, राहुल राजेंद्र काळे, वेदांत शेळके, रोहीत ज्ञानदेव रोहोम, देवेंद्र दत्तात्रय सिनगर, आकाश कुमार, विक्रम जालिंदर जगताप, पुजा भाऊसाहेब ढवळे, दिया विलास पवार, गार्विता प्रदिप मोरे, धनश्री सुनिल गिरमे, शीतल भागीनाथ शेलार, वैभव रंगनाथ आवारे, श्रध्दा संजय सरवार, तेजस होन, प्रतिक अशोक सोनवणे, अवेज अन्सार शेख , किरण राजु चव्हाण, प्रज्ञा संजय शिंगाडे , श्रध्दा सुदाम चिंधे, प्रियंका सुदाम उगलमोगले, अंकिता किरण सोनवणे, मोनाली बाळासाहेब गाढे, ओम भोसले, प्रज्वल जयंत दुरगुडे, इर्फानशहा तैमुरशहा इनामदार, ऋषिकेश गुडदेे, हरीओम मनोज देशमुख, अल्लाबक्ष अब्दुल पठाण, सागर बाळासाहेब आहेर आणि शुभम सोपान कोटमे यांचा समावेश आहे. हे सर्व नवोदित अभियंते त्यांचा अतिम परीक्षेचा निकाल जाहिर होताच कंपनीच्या सेवेत रूजु होणार आहेत.
संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले आहे. श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे, प्रा. गिरीश वट्टमवार, प्रा. गणेश जोर्वेकर, प्रा. प्रविण खटकाळे व प्रा. योगेश जगताप उपस्थित होते.

फोटो ओळी:- संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे समवेत मायडिया कंपनीत निवड झालेले संजीवनी पाॅलीटेक्निकचे नवोदित अभियंते. यावेळी प्राचार्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.
