कोपरगाव मतदार संघातील तीर्थक्षेत्र विकासासाठी पुन्हा २.५० कोटी निधी मंजूर:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील देवस्थानांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून देवस्थानांना पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून २ कोटी ५० लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाची पौराणिक व ऐतिहासिक अशी वेगळी ओळख आहे. मतदार संघामध्ये अनेक पौराणिक व जागृत देवस्थान असून हि देवस्थाने नागरिकांची श्रद्धास्थान आहेत. या देवस्थानांच्या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्यकम होत असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र या देवस्थानाच्या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळ्त नव्हत्या याची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांचा या देवस्थानांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील मंजूर येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान (४९.९७ लाख), ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान (४९.९६ लाख), कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान (४९.९९ लाख), राहाता तालुक्यातील वाकडी येथील श्री खंडोबा देवस्थान (४९.९४ लाख) व कान्हेगाव येथील श्री नरहरी देवस्थान (४९.९८ लाख) या देवस्थानांचा समावेश असून या सर्व देवस्थानांना प्रत्येकी २५ लाख या प्रमाणे १ कोटी २५ लाख रुपये निधी परिसर सुशोभीकरणासाठी ना. आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणला आहे.
यापूर्वी देखील पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर गणपती देवस्थान (४९.९७ लाख), पुणतांबा येथील श्री चांगदेव महाराज समाधी मंदिर (९९.९९ लाख), माहेगाव देशमुख येथील श्री दत्त मंदिर देवस्थान (४९.९७ लाख), प्रती जेजुरी अशी ओळख असलेल्या वाकडी येथील खंडोबा मंदिर देवस्थान (१९.९८ लाख), कोकमठाण येथील लक्ष्मी माता मंदिर देवस्थान (४९.९८ लाख) व चांदेकसारे येथील श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान (४९.९९ लाख) या देवस्थानांसाठी एकूण ३.१९ कोटी निधी ना. आशुतोष काळे यांनी आणला असून पुन्हा एकदा २ कोटी ५० लाख निधी आणला आहे. मतदार संघातील देवस्थानांच्या विकासासाठी ना. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळे मागील काही वर्षापासून विकासापासून उपेक्षित असणाऱ्या देवस्थानांचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सबंधित देवस्थान असलेल्या गावातील नागरिकांमध्ये व पंचक्रोशीतील नागरिक भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या देवस्थानाच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे, पर्यटन राज्य मंत्री ना. अदिती तटकरे यांचे ना.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *