अकरा वर्षापासुन शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नाटेगांवच्या भक्तांची कावडीद्वारे जलसेवा:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
रामनवमी उत्सवानिमीत्त शिर्डीच्या साईबाबांना गेल्या अकरा वर्षापासुन सायकलद्वारे नाटेगांवचे साईभक्त विविध ठिकाणावरून कावडीद्वारे जल घेवुन त्याचा अभिषेक करतात, त्यांनी यावर्षी थेट मध्यप्रदेशातील अमरकंटक येथुन जल आणले त्यांची ही परंपरा इतरांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
मध्यप्रदेशातील अमरकंटक ते शिर्डी हे ११५५ किलोमिटरचे अंतर सायकलद्वारे नाटेगांवच्या साईभक्तांनी यशस्वीरित्या पार केले त्याबददल त्यांचा गौरव विवेक कोल्हे व त्यांच्या सहका-यांनी केला त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी सरपंच विकास मोरे यांनी प्रास्तविक केले. या सायकल जलसेवा यात्रेत सर्वश्री. रामाकाका मोरे, प्रभाकर मोरे, शिवाजी लभडे, नितीन मोरे, सोमनाथ वर्षे, भास्कर मोरे, राजेंद्र मोरे, दत्तात्रय खोकले, सतिष मोरे, अमित मोरे, खंडु मोरे, सागर मोरे, दत्तु जराटे, शांताराम भोरकडे, गणेश हिरे, श्रीमती कल्याबाई पिंगळे, लता मोरे आदि साईभक्त सहभागी झाले होते.
श्री. विवेक कोल्हे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासुन कोरोना परिस्थिती असल्याने शिर्डीतील रामनवमी उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. नाटेगांवचे साईभक्त गेल्या अकरा वर्षापासून विविध ठिकाणांहुन पवित्र जल कावडीद्वारे आणून त्याचा अभिषेक साईबाबांच्या चरणी करतात त्यांची ही सेवा कौतुकास्पद असुन श्रध्दा सबुरी सर्वधर्मसमभावाची त्यातुन ते जपवणूक करतात हा विचार सर्वांनी आत्मसात करावा असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *