कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहराच्या विविध प्रभागाप्रमाणे प्रभाग क्रमांक १४ (पूर्वीचा १३) मधील विकासाचे विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे अशा आशयाचे निवेदन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, प्रभागातील सर्व गटारी व गजानन नगर भागातील सांडपाण्याचा मोठा नाला पावसाळ्यापूर्वी साफ करावा. संतोष बारसे घरामागील गटार बंदिस्त करण्यात यावी, सय्यद विसपुते यांच्या घरापुढील गटार बंदिस्त करण्यात यावी, नादुरूस्त पेव्हर ब्लॉक दुरुस्त करण्यात यावे, गजानन नगर भागातील सप्तशृंगी देवी मंदिर व बुद्ध विहार परिसरात पेव्हर ब्लॉक, हायमॅक्स लाईट बसविणे तसेच सुशोभिकरण करणे, बुद्ध विहार ते संत गोरोबा काका मंदिर रस्त्याचे मजबुतीकरण करणे, नवीन पाण्याच्या पाईपलाईनचे कनेक्शन सुरळीत करावे, गजानन भागातील बुद्धविहार समोरील नाल्यावरील पुलाची दुरुस्ती करावी, संत गोरोबाकाका जलकुंभास सुरक्षा कंपाउंड करून त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी व गजानन भागातील महिला शौचालय समोरील ब्लॉक दुरुस्त करावे आदी मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरच प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांना येत असलेल्या अडचणी सोडवू अशी ग्वाही मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी उपस्थितांना यावेळी दिली
यावेळी वाल्मिक लहिरे, एकनाथ गंगूले, गणेश बोरुडे, नितीन साबळे, संतोष बारसे, नईम शेख, सोनाली गंगूले, भाग्यश्री बोरुडे, सचिन जाधव, दत्तू विसपुते, गणेश डुबे, भानुदास उपाध्ये, राजेंद्र धनवटे, शकील चोपदार, नदीम चोपदार, सलीम शेख, संतोष त्रिंबके, अण्णासाहेब जाधव, दासीराम कदम, मीना घोडेराव, संजय साबळे, प्रमोद साबळे, पांडुरंग देसाई, सुभाष जोर्वेकर, किशोरजी थोरात, बबई लोंढे, सावळेराम वाकळे, कुसुमआष्टेकर, गुलबेगम शेख, माई जोर्वेकर, स्वाती कदम, चंद्रकला सोमासे, मीनाजगदाळे, सोनी बागुल, कमल वाकळे, हिराबाई सोनवणे, अंजली वाकचौरे आदी उपस्थित होते.


फोटो ओळ:- प्र. क्र. १४ मधील विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा अशा आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी यांना देतांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.
