अ.भा. मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष नियुक्त्या जाहीर, उत्तर महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांची नियुक्ती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(मुंबई): -मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.. ऑगस्ट २०२६ पर्यत नवे उपाध्यक्ष कार्यरत असतील.. विभागीय चिटणीस आणि उपाध्यक्षांनी विभागात संघटनात्मक काम वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.. नवे उपाध्यक्ष पुढील प्रमाणे.. पश्चिम महाराष्ट्र : गणेश मोकाशी, संपादक राज्य लोकतंत्र, (पुणे), कोकण विभाग: हेमंत वणजू, रत्नागिरी, मराठवाडा : प्रकाश कांबळे, (नांदेड) , उत्तर महाराष्ट्र : गो. पी. लांडगे, (धुळे) , विदर्भ : अविनाश भांडेकर, (गडचिरोली) आणि चंद्रकांत बर्डे (बुलढाणा). सर्व नवीन उपाध्यक्षांचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *