

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री साईबाबा संस्थानला हरीयाणा येथील देणगीदार साईभक्त महेंदर कुमार सिंघल यांनी सुमारे १३.८५ लाख रुपये किंमतीची फोर्स कंपनीची ट्रॅक्स श्रेणीतील रुग्णवाहीका देणगी स्वरुपात दिली. यावेळी देणगीदार साईभक्त यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सदर रुग्णवाहीकेची चावी सुपूर्त केली. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, वाहन विभाग प्रमुख प्रकाश क्षिरसागर, मंदिर पुजारी, कर्मचारी तसेच देणगीदार साईभक्त व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

