
कोपरगाव प्रतिनिधी:-
काही दिवसापुर्वी कोपरगाव शहरात भाडेकरु म्हणुन आलेल्या दागिने चोरांना कोपरगाव शहर पोलिसांनी शोध घेवुन जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर बातमी अशी की,फिर्यादी नामे महेश नारायण कडलग वय २४ वर्ष धंदा शिक्षण रा. गांधीनगर कोपरगाव जि. अहमदनगर – यांनी त्यांचे बहिण्याचे लग्नाकरीता सोन्याचे दागीने बनविलेले होते. फिर्यादीचे आईचे मालकीच्या घरात यातील आरोपी नवनीत मधुकर नाईक व त्यांची पत्नी स्मिता नवनीत नाईक दोघे रा. मुंबई हे एक महिण्यासाठी भाडोत्री राहवयास होते त्या दरम्यान त्यांनी फिर्यादीचे आईचा विश्वास संपादन करून त्यांचे घरातुन फिर्यादी यांनी त्यांचे बहिण्याच्या लग्नासाठी बनविलेले दागीने व रोख रक्कम असा असा किमती मुद्देमाल चोरुन घेवून पळुन गेले त्यावरुन महेश नारायण कडलग वय २४ वर्ष धंदा शिक्षण रा.गांधीनगर कोपरगाव यांचे तक्रारीवरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु रजि नंबर १७८/२०१८ भा.द.वि. कलम ४५७,३९०,३४ प्रमाणे दिनांक २२/९/२०१८ रोजी दाखल आहे.सदर गुन्हयातील आरोपींचा वरिष्ठांचे मार्गदर्शनाने शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडेस विचारपुस करुन तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून चोरून नेलेला मुद्देमाल काढुन दिला त्याचे वर्णन खालील प्रमाणे १२.१२४ ग्रॅम वजनाचे गंठन, १०.५४० ग्रॅम वजनाचा नेकलेस ,०.६ गेमचा लड.,११.५० ग्रॅमचा लड, २०.१९० ग्रॅमचा लड,१६.३२० ग्रॅमचा लड,४३.०० ग्रॅम वजनाचा लड. ,११.०२ ग्रॅम वजनाचा लड़ एकुण ११९.२२४ ग्रॅम वजनाचे (१२तोळे) सोन्याचे दागीने ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्येमाल आरोपी नवनीत मधुकर नाईक व त्याची पत्नी स्मिता नवनीत नाईक दोघे रा. मुंबई यांचेकडुन हस्तगत केला आहे.

आरोपीतांना सदर गुन्हयात अटक केलेली आहे. सदरचा जप्त मुद्येमाल ११९.२२४ ग्रॅम वजनाचे (१२ तोळे ) ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने हे १८/१२/२०२१ रोजी यातील फिर्यादी व त्यांची आई यांचे ताब्यात दिले आहे.सदरची तपास कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. देसले, पोसई भरत नागरे, पो ना/सचिन शेवाळे, पो कॉ थोरात, पो.कॉ /काटे, पो.कॉ/खारतोडे म.पो ना बनकर यांनी केलेली आहे.
