कोपरगाव येथील नाभिक समाज पदाधिकारी यांची नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री. मनोज वाघ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली‌..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि. १२ डिसेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन व सामाजिक कामासाठी कोपरगाव येथील नाभिक समाज पदाधिकारी युवा नेते श्री दिनेशभाऊ संत, श्री पप्पूशेठ निकम, श्री गणेशभाऊ बिडवे, श्री संजयभाऊ राऊत आले असता नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली‌.

यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, सत्कार प्रसंगी शिर्डीतील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक श्री आनंदभाऊ बिडवे, श्री अनिलभाऊ कदम, श्री गोविंदभाऊ आहेर, शिर्डी शहर उपाध्यक्ष शाहरुख शेख आदी समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वाढती महागाई, इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील सलूनच्या ही कामाचे दर वाढले गेले पाहिजेत असे मनोगत सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावर लवकरच वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे यावेळी मनोजभाऊंनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *