संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून दिंडी काढत पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडवले…

कोपरगाव प्रतिनिधी:-वारकरी पोशाख, डोक्यावर तुळस, भगवी पताका उंच डोलवत,टाळाच्या सुंदर तालात फुगडीचा ठेका धरत, विठ्ठल नामाचा जयघोष करत विठ्ठल रुखमाईच्या सानिध्यात पावली,लेझिम खेळत संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून दिंडी काढत पंढरपूरच्या वारीचे दर्शन कोपरगावकराना घडवित पर्यावरणाचा समतोल राखा,वृक्ष संवर्धन हि काळाची गरज,पाणी आडवा पाणी जिरवा असे अनेक जनजागृतीपर संदेशाचे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेवून […]

Read More

संजीवनी उद्योग समूहाचेवतीने गणेशच्या अध्यक्षांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी संजीवनी उद्योग समूहास भेट दिल्याबद्दल त्यांचा शुक्रवारी कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे थोरात गटाचे १९ पैकी १८ संचालक निवडून आले त्यानंतर अध्यक्षपदी सुधीर लहारे, तर उपाध्यक्षपदी विजय दंडवते यांची बिनविरोध निवड […]

Read More

बिपीनदादा कोल्हे हे गोरगरिबांचे आधारवड; वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाचा उपक्रम प्रेरणादायी:- पराग संधान…

बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त एम. के. आढाव विद्यालय, न. प. शाळा क्र. ३ व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…कोपरगाव प्रतिनिधी:- माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक लोकनेते बिपीनदादा कोल्हे हे समाजसेवेचा वारसा अखंड जपत आहेत. […]

Read More

‘सूर्यतेज’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण…

कोपरगाव प्रतिनिधी:-आषाढी एकादशी आणि सूर्यतेज संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त स्वच्छता-जलशक्ती-वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे आंबा, बेल रोपांचे वृक्षारोपण करून पालकत्व दिले आहे.या प्रसंगी सूर्यतेज संस्थापक व वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके, वसतिगृह अधिक्षक धन्यकुमार सरवदे,अॅड.श्रध्दा जवाद, अनिल अमृतकर, अतुल कोताडे, शिरिष धनवटे,सौ.वासंती गोंजारे, गोविंद जवाद, परेश उदावंत,नंदकिशोर सरोदे यांचे सह सूर्यतेज सदस्य,विद्यार्थी उपस्थित […]

Read More

रेल्वेच्या भुयारी मार्गातील पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा; स्नेहलताताई कोल्हे यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनीधी:- मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्यात आले असून, या भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे नागरिकांना भुयारी मार्गातून ये-जा करणे कठीण झाले आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात व इतर अनेक ठिकाणी शेतकरी, विद्यार्थी व प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा; आषाढी एकादशीनिमित्त वारकरी व भाविकांना फराळ वाटपाबद्दल मुस्लिम समाजबांधवांचे केले कौतुक…

कोपरगाव प्रतिनिधी:- आज गुरुवारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त येसगाव येथील मुस्लिम समाजबांधवांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार आणि भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. स्नेहलताताई कोल्हे यांनी आनंदाने मुस्लिम बांधवांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून त्यांना बकरी ईदच्या […]

Read More

ब्रम्हलिन संत रामदासीबाबा तीनखणी कोकमठाण येथे गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम…

कोपरगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेल्या श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा तीन खणी मंदिरात सालाबादप्रमाणे याही व गुरूपौर्णिमेनिमीत्त विविध धार्मिक कार्यकमाचे आयोजन करण्यांत आले आहे.३ जुलै रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत सौ. पल्लवी व श्री. नितीन बाळासाहेब जाधव या उभयतांच्या हस्ते रामदासीबाबा मुर्तीस कोकमठाण, कोपरगांव बेट व कोपरगांव येथील ब्रम्हरूदांच्या […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त वारी सोहळ्यात हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीर्षी आषाढी एकादशी निमित्त संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काढण्यात आली. यावेळी या दिंडीत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पहायला मिळाले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.सालाबाद प्रमाणे याहीवर्षी गौतम पब्लिक स्कूलमध्ये आषाढी वारीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोपरगाव ग्रामीण पोलीस […]

Read More

राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी आश्रमात ३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सव…

 कोपरगांव प्रतिनीधी:-          कोपरगांव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधीस्थानावर गुरूपौर्णिमा उत्सव ३ जुलै रोजी पहाटे चार ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यांत आला असून त्यानिमीत्त विविध धार्मीक कार्यक्रम होत असल्याची माहिती श्री संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे मठाधिपती विश्वस्थ प. […]

Read More

आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत विदयार्थी दिंडी सोहळा रंगला..!

कोपरगांव प्रतिनिधी:-आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात विदयार्थी वारकरी बनले आणि वारकरी दिंडीचे आयोजन उत्साहाने करण्यात आले.वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर , अशा भक्तिमय वातावरणात शहरातील मुख्य मार्गावर विद्यालयचा विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,आदि संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. शाळेतील काही वर्गातील […]

Read More