
बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त एम. के. आढाव विद्यालय, न. प. शाळा क्र. ३ व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…
कोपरगाव प्रतिनिधी:- माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक लोकनेते बिपीनदादा कोल्हे हे समाजसेवेचा वारसा अखंड जपत आहेत. ते गोरगरिबांचे आधारवड असून, गेल्या ३०-३५ वर्षांपासून ते साधेपणाने वाढदिवस साजरा करून पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करतात. दरवर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणारा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी केले.



संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस २१ जून रोजी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील नगर परिषदेच्या माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, नगर परिषद शाळा क्र. ३ (मुली) आणि रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुक्रवारी (३० जून) मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच एम. के. आढाव विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरपालिकेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक गोपीनाथ गायकवाड, माजी नगरसेवक नसीरभाई सय्यद, संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, नगर परिषद शिक्षण मंडळाचे सदस्य अमित पराई, भाजप शहर उपाध्यक्ष सचिन सावंत, चंद्रकांत वाघमारे, संतोष साबळे, भाजप किसन मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, एम. के. आढाव विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक चंद्रकांत शेजवळ, शिक्षक मारुती काटे, प्रमोद लष्करे, महेश विखे, प्रसाद मुसमाडे, सतीश कर्पे, शिक्षिका अर्चना बोराडे, अलका भोसले, स्नेहल वाघचौरे, जयश्री जाधव, नगर परिषद शाळा क्र. ३ (मुली) च्या मुख्याध्यापिका निर्मला निकम, शिक्षिका रजनी गायकवाड, अनुराधा सोमासे, सरस्वती कानडे, विमल वाणी, गीतांजली चौधरी, प्रताप वळवी, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार खाडे, उपशिक्षिका यु. एम. घुले, एम. एस. शिंदे, के. एस. वलटे, आर. बी. बडे, एम. डी. कुमावत, ए. एस. घुगे, एस. ए. पंडोरे, एम. एस. पावले, खिल्लारी, शिक्षकेतर कर्मचारी अनिल वायखिंडे, गयाबाई नरोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी पराग संधान म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांनी सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, सिंचन, शैक्षणिक, उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट घडविण्याबरोबर आयुष्यभर नि:स्वार्थी भावनेने समाजसेवा केली. कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समूह अडीअडचणीच्या व नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेहमीच जनतेच्या मदतीला धावून जातो. स्व. कोल्हेसाहेब यांचा जनसेवेचा वारसा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे समर्थपणे पुढे चालवत आहेत. बिपीनदादा कोल्हे हे सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करत आहेत. जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या बिपीनदादांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची चळवळ हाती घेऊन मागेल त्याला वृक्ष पुरवून त्याच्या जोपासनेसाठी नेहमीच मदत केलेली आहे. गेल्या ३०-३५ वर्षांपासून ते आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करतात. दरवर्षी ते आपल्या वाढदिवसाला हार, तुरे, शाल, सत्कार न स्वीकारता शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी मदत करतात. असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे, यासाठी ते नि:स्वार्थी भावनेतून कायम सहकार्य करतात. त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.
बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी कोपरगाव शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना अडीच ते तीन लाख वह्यांचे वाटप करण्यात येते. यावर्षीही हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बिपीनदादांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करताना तालुक्यात एक लाखावर झाडे लावली आहेत. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनावर भर देऊन पर्यावरण संतुलनाचे मोठे काम ते करत आहेत, असे सांगून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी बिपीनदादा कोल्हे यांच्याकडे मांडून त्यांना निश्चितपणे मदत करू, अशी ग्वाही संधान यांनी दिली. एम. के. आढाव विद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल व्हॅन व स्वखर्चाने विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवित असल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले.
डी. आर. काले व राजेंद्र सोनवणे यांनी कोल्हे कुटुंबीय समाजसेवेत अग्रेसर असल्याचे सांगून त्यांच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे हे कोपरगाव शहर व तालुक्यातील जनतेचे व विकासाचे विविध प्रश्न सोडविण्याबरोबर अतिवृष्टी, महापूर, पाणीटंचाई व इतर संकटाच्या काळात नेहमीच जनतेच्या मदतीला धावून जातात. जात-धर्म न पाहता जनहिताचे राजकारण व समाजकारण करणारे कोल्हे कुटुंबीय सर्वसामान्य व दीन-दुबळ्या जनतेचे आधारस्तंभ आहेत. कोरोना महामारीत दोलायमान झालेली बाजारपेठ पूर्वपदावर आणण्यासाठी, शेतकरी, व्यापारी व अन्य समाजघटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला, असे त्यांनी सांगितले. बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करून एक चांगला उपक्रम राबविल्याबद्दल एम. के. आढाव विद्यालय, न. प. शाळा क्र. ३ व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील शिक्षकांनी बिपीनदादा कोल्हे व आयोजकांचे आभार मानले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रताप वळवी व अर्चना बोराडे यांनी केले.
