कडूलिंबाची पानझड व जळण्याचे संशोधन उपाययोजनेची गरज; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांचे पत्र…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव व राहाता तालुक्यातील कडूलिंबाची झाडे गेल्या काही दिवासांपासून पानझड होवून झाडे जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.ही बाब स्वच्छतादूत पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांचे लक्षात येताच त्यांनी राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना पत्र पाठवून त्यांचे स्तरावर वनस्पतीशास्राचे तज्ञ पथकाद्वारे या गंभीर विषयावर तातडीने संशोधन होवून उपाययोजना कळविण्यात याव्यात.जेणेकरुन शासनस्तरावर अथवा लोकसहभागातून कडूलिंब वृक्ष […]

Read More

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर येथील पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विशेष कार्याचा उल्लेख शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केला. यशवंतराव चव्हाणांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी […]

Read More

गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवार (दि.२९) रोजी कोपरगाव व राहाता येथे होणार असुन आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली खाली होईल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवार (दि.२९) रोजी कोपरगाव व राहाता येथे होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.त्यानुसार डाव्या कालव्याची बैठक हि सोमवार (दि.२९) रोजी सकाळी १०.०० वाजता आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे होणार आहे. तसेच उजव्या कालव्याची […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३२२२६ झाल्या असुन १५०३९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८०५ आहे तर उपचार सुरू असलेले ६ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२५ नोव्हेंबर २०२१ आज ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २१५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

देवळाली प्रवरा बजारताळ येथील नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या दुसऱ्या मजल्यावरून पडून:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:- देवळाली प्रवरा बजारताळ येथील नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगार गंभीर जखमी.देवळाली बाजारतळ या ठिकाणी असलेल्या पोस्ट ऑफिस लाइन दुकान गळ्यांच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या नगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामावरील बांधकाम कर्मचारी बाळासाहेब कोहकडे (रा. उक्कालगाव) वय अंदाजे 50 वर्ष हे काम करत असताना दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजनेच्या सुमारास […]

Read More

छत्तीसगढचे ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव…

२८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण… कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई, पुणे, नाशिक):-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना देण्यात येणार आहे. […]

Read More

महाराष्ट्र राज्य वासुदेव जोशी समाजाच्या राज्यकार्यकारीणीवर कोपरगांव पदाधिकाऱ्यांची निवड भाजपा तर्फे सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य वासुदेव जोशी समाजाच्या राज्यकार्यकारीणीवर कोपरगांव शहरातील पदाधिकाऱ्यांची निवड झाली. या नविन पदाधिकाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात कार्याअर सत्कार करण्यात आला भाजपा ज्येष्ठ सेलचे शहराध्यक्ष श्री.विष्णुपंत गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते.वासुदेव जोशी समाज समितीचे जिल्हा सरचिटणीस दीपक सुपेकर प्रास्ताविक करताना म्हणाले की, राज्य समितीचे अध्यक्ष श्री.दिलीपराव परदेशी यांच्या नेतृत्वाखाली […]

Read More

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची संजीवनी उद्योग समुहास भेट…

कोपरगांव प्रतिनिधी:-नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी संजीवनी उद्योग समुहास भेट देवून रासायनीक प्रकल्प व साखर उत्पादन विभागाची पाहणी केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी त्यांचा सत्कार करून सहकारी साखर कारखानदारीत अत्याधूनिकता जोपासत कारखान्यांत केलेल्या नाविन्यपुर्ण बदलाची माहिती दिली.प्रारंभी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी स्वागत केले. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर […]

Read More

ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठा योजनांबाबत आ.आशुतोष काळेंनी घेतली पाणीपुरवठा सचिवांची भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून पूर्ण झाले आहे. या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, वारी-कान्हेगाव, मळेगाव थडी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३१७४७ झाल्या असुन १५०३६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७९६ आहे तर उपचार सुरू असलेले १२ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ नोव्हेंबर २०२१ आज ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २१० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More