कडूलिंबाची पानझड व जळण्याचे संशोधन उपाययोजनेची गरज; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांचे पत्र…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव व राहाता तालुक्यातील कडूलिंबाची झाडे गेल्या काही दिवासांपासून पानझड होवून झाडे जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.ही बाब स्वच्छतादूत पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांचे लक्षात येताच त्यांनी राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना पत्र पाठवून त्यांचे स्तरावर वनस्पतीशास्राचे तज्ञ पथकाद्वारे या गंभीर विषयावर तातडीने संशोधन होवून उपाययोजना कळविण्यात याव्यात.जेणेकरुन शासनस्तरावर अथवा लोकसहभागातून कडूलिंब वृक्ष हानी थांबविता येईल.असे कळवले आहे…


कोपरगाव व राहाता तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सूर्यतेज संस्थापक व वृक्ष प्रेमी सुशांत घोडके यांनी स्वच्छता-जलशक्ती-वृक्षारोपण पर्यावरण अभियानात ५ वर्षात सुमारे ६० हजार विविध रोपांचे लोकसहभागातून मोफत वितरण,रोपण आणि “एक व्यक्ती एक झाड” असे पालकत्व दिले आहे.यात सुमारे ३५ हजार पेक्षा जास्त कडूलिंब झाडे आयुर्वेद,आॅक्सिजन,पर्यावरणचा समतोल अबाधित राखण्यासाठी रोपण करण्यात आली आहे.तसेच ईतरही वृक्ष प्रेमी, स्वयंसेवी संस्था,शेतकरी व शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात कडूलिंबाची झाडे लावण्यात आली आहे…
झाडांची पानझड कमी-अधिक प्रमाणात वर्षभर सुरू असते.वसंत ऋतूत चैत्र पालवी नव्याने फुटते.माघ, फाल्गुन महिन्यातील पानझड होवून चैत्रात झाडांना नवीन पालवी फुटते.वसंत ऋतूचा सुखद अनुभव जीवसृष्टी अनुभवते.यात कडूलिंबांची शुध्द हवा आणि उन्हाळ्यात सावलीचा गारवा सारेच अनुभवतात.आयुर्वेदातही कडूलिंबाचे महत्व सांगितले आहे.तसेच कडूलिंबाचे लिंबोळ्याचा उपयोग सेंद्रिय शेतीत देशपातळीवर उपयुक्त ठरत आहे.विविध पक्षांचे रमण्याचे ठिकाण कडूलिंब झाड आहे. मात्र आश्विन व कार्तिक महिन्यात कडूलिंबाचे झाडांची पानझड होवून सुकणे(जळणे)प्रमाण वाढले आहे…
कडूलिंब जळण्याचे(बदलते हवामान,आलेला रोग,५ जी…)नेमके काय कारण आहे ? व यावर ठोस व प्रभावी ऊपाय काय असाव्यात यावर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वनस्पती शास्त्राचे तज्ञांव्दारे तातडीने संशोधन होवून उपाययोजना कळविण्यात याव्यात.असे पत्रात म्हटले आहे.पत्रासोबत कडूलिंबाची होत असलेली पानझड व जळीत झाडांचे छायाचित्र पाठवले आहे…
या पत्राची प्रत माहितीसाठी भारताचे प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नासिक विभागीय आयुक्त,अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,उपवनसंरक्षक साहेब, वनविभाग/ सामाजिक वनीकरण,उपअधिकारी, तहसिलदार राहाता,कोपरगाव, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग, सामाजिक वनीकरण,यासह पर्यावरण प्रेमी यांना पाठविण्यात येवून या विषयी लक्ष वेधले आहे…
वृक्षवल्लीआम्हासोयरेवनचरे… झाडेलावाझाडेजगवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *