
कर्मयोगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या बावनकशी मुशीत निर्ढावलेला यशस्वी युवक “विवेक भैय्या कोल्हे”…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्मयोगीसहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, आंतरराष्ट्रीय इफको सहकारी बी बियाणे खत कंपनीचे माजी जेष्ठ संचालक व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे या त्रिगुणात्मक संस्कांर रोमारोमात भिनलेल्या युवा नेता विवेक कोल्हे यांनी अल्प वयात विवेकी आचार, निडरता, प्रत्येक क्षणात आगळेवेगळे डोळे दिपावणारे विक्रमी उपक्रम राबविणाऱा युवक विवेक भैय्या यांनी जागतिक पातळीवर अढळ अव्वल स्थान मिळविण्याची दमदार वाटचाल सुरू केली आहे. .
विवेक भैय्या कोल्हे यांनी कोपरगां नगर परिषद व, श्री गणेश सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणुकीत मिळवलेल्या यशाने प्रतिकूल परिस्थितीत हम भी कुछ कम नहीं हे सिद्ध केले. श्री पराग संधान सारख्या कर्तबगार व धाडसी युवकास नगराध्यक्षपदी बसवले. त्यामुळे आज कोपरगाव शहरात जलद गतीने विकास होत आहे.
अल्पवयातच सिमेवरील सैन्यांना जागेवर जाऊन राखी बांधण्याचा यशस्वी भव्यदिव्य उपक्रम राबविण्याची किमया सहज साध्य केली आहे. सर्व पातळ्यांवर हजारो युवकांना स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खुश करणारे पॅकेज मिळवून देण्याची किमया सहज साध्य केली आहे याच मुळे युवकांचे सर्वोत्तम संघटन निर्माण झाले आहे.
कर्म योगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा यांच्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना साखर कारखान्याचे विविध प्रकारच्या उपपदार्थ निर्मितीतून रोजगार नव्हे आर्थिक स्वावलंबी बनविले याचमुळे संपूर्ण देशात विक्रमी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असतानाच कोपरगांव तालुका कायमस्वरूपी अपवाद ठरविला जातो.
जगात इंधन टंचाईत भारतीय जनतेला इथेनॉल त्यांचे उपपदार्थ निर्मितीतून कायमची अमृत संजीवनी देतानाच अनेक आंतरराष्ट्रीय इंधन पुरवठा वितरण करणाऱ्या कंपन्याशी करार करण्या धडाका लावला आहे
आजच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदीजी,केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री नामदार अमित शहाजी, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीसजी यांच्या त्रिवेणी संगमी कर्तबगारी तून त्यांना विधान परिषद सदस्य पदाची भेट विवेक भैय्या यांच्या वाढदिवसानिमित्त मिळाल्यास कोणासह आश्चर्य वाटणार नाही आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर राज्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे दूरदर्शी आणि संयमी नेतृत्व, आमचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान, सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन
विवेक भैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आणि कोल्हे परिवारातील तीन पिढ्यांना भावी दिर्घायुष्य कायमस्वरूपी सर्वोत्तम सुखसमृद्धीचे सुखदायक आरोग्यदायी जावो आणि परिवाराच्या हातून भूतो न भविष्यती अशी देशसेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव
