
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- काळे परिवाराकडे समाजकारणाचा आदर्श वारसा आहे. मा. खा.कर्मवीर शंकररावजी काळे, माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच समाजाच्या अडीअडचणीत मदत केली असून जेष्ठ नागरिकांना देखील नेहमीच मदतीचा हात दिला आहे. हाच वारसा आ. आशुतोष काळे समर्थपणे पुढे चालवीत असून जेष्ठ नागरिकांना आ.आशुतोष काळेंची मोलाची मदत मिळत असल्याचे कोपरगाव जेष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष विजय बंब यांनी सांगितले आहे.
काळे परिवाराच्या चार पिढ्यापासून काळे परिवाराची समाजाशी नाळ जुळली आहे. त्यामुळे समाजाच्या सुख-दु:खात काळे परिवार नेहमीच पुढे राहिला आहे. जेष्ठ नागरिक मंचाचा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असतांना आम्हा जेष्ठ नागरिकांना देखील अनेक अडचणी येत असतात. जेष्ठ नागरिक म्हटले की, काहीसे परावलंबी जीवन असते. त्यामुळे सर्व जेष्ठ नागरिकांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जेष्ठ नागरिक मंच काम करीत आहे. जेष्ठ नागरिकांपुढे अनेक अडचणी असतात. कुठे हॉस्पिटलमध्ये उपचार, तर कधी शासकीय कार्यालयात विविध दाखले मिळविण्यासाठी करावी लागणारी कसरत तर कुठे निवृत्ती वेतन मिळण्यात बँकेच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणी अशा अनेक प्रकारच्या अडचणींचा जेष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामना करावा लागत असतो.
मात्र कोपरगावातील जेष्ठ नागरिकांना अशा अडचणी येत नाही त्याचे कारण आ. आशुतोष काळे आहेत. ज्या-ज्यावेळी अडचणी आल्या त्या-त्यावेळी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या अडचणी तात्काळ सुटतात त्यामुळे माझे काम सोपे होत आहे. जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या असल्यामुळे शारीरिक त्रास सहन करावा लागतो. हा शारीरिक त्रास दूर होण्यासाठी प्रत्येक जेष्ठ नागरिक तज्ञ डॉक्टरांकडे जावू शकत नाही. हि अडचण ओळखून जेष्ठ नागरिकांची हि अडचण दूर करण्यासाठी आ. आशुतोष काळे जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेतात याचा आम्हाला मोठा फायदा होतो. त्यामुळे आपली काळजी घेणारे आपल्या परिवारातील एक सदस्य आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने आपल्या मागे उभा आहे याची आम्हा जेष्ठ नागरिकांना खात्री असल्यामुळे आमचे जीवन सुसह्य झाले असल्याचे कोपरगाव जेष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष विजय बंब यांनी म्हटले आहे.
