कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती जागतिक युवा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती जागतिक युवा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी श्री.गो.विदयालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशनचे सचिव दिलीप अजमेरे यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.आर.बी.गायकवाड यांनी मानले.
या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर ,आर.आर.लकारे एस.एन.शिरसाळे,के. एस.गोसावी,ए.के.काले ,श्रीमती यु.एस.रायतेआदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिना निमित्त त्यांना अभिवादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *