
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव व शहरातील सर्व सामान्य जनतेच्या समस्या मांडत असताना निर्भीड पत्रकारामुळे माझ्या लेखणीला बळ मिळाले
बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पाहिले वृत्त पत्र 6 जाने 1832 रोजी सुरू करून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न ब्रिटीश सरकार पर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला त्या करिता या वृत्त पत्रात एक स्तंभ इंग्रजी मध्ये लिहीत असत
कोपरगाव तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या अनेक समस्या मांडण्याची संधी कोपरगाव च्या निर्भीड पत्रकारामुळे मला प्राप्त झाली माझ्याकडे कोणतीही आर्थिक संस्था अगर राजकीय पद नाही असे असताना लेखनातील सातत्य कायम ठेवून शेतकरी, कष्टकरी,कामगार दिन दलित व पाणी रस्ते अशा अनेक नागरी समस्या मांडत गेलो त्यास प्रस्थापितांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता अनेक पत्रकारांनी या समस्या आपल्या वृत्तपत्रे,व चॅनल,वेब न्युज द्वारे प्रसिद्ध केल्या त्यामुळे प्रशासनाला धारेवर धरून अनेक समस्या मार्गी लागल्या असून याचे संपूर्ण श्रेय कोपरगाव तालुक्यातील निर्भीड पत्रकारांना जाते मी मांडलेल्या समस्या सोडवण्यात कोपरगाव तालुक्यातील पत्रकारांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या मुळे माझ्या लेखणीला बळ मिळाले आहे
सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अँड.नितीन पोळ
(प्रदेश अध्यक्ष)
