
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.16/2/2021 च्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी स्वतःच्या अधिकारात असलेल्या आयत्या वेळच्या विषयांत कोपरगाव नगरपरिषदेच्या 2 जलकुंभाच्या नामकरणाचा विषय मांडला मांडला. नामकरण विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
1) शिंदे शिंगी नगर येथील जलकुंभास “भगवान महावीर जलकुंभ”
2) वडांगळे वस्ती-स्टेशन रोड जलकुंभास–
” नेताजी सुभाषचंद्र बोस जलकुंभ”
त्याचप्रमाणे गोदावरी लहानपुल ते
शुक्राचार्य मंदिर(बेट) रस्त्याचे
” परम सद्गुरू श्री.शुक्राचार्य महाराज पालखी मार्ग”
अशी नांवे देण्याचा निर्णय झाला.
यापुर्वी
1) गोरोबा नगर जलकुंभाचे
“श्री संत गोरोबाकाका जलकुंभ”
2) समता नगर जलकुंभाचे
” क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले”
जलकुंभ
3) जलशुद्धीकरण केंद्र जलकुंभास
” स्व.बाळासाहेब सातभाई जलकुंभ”
4) ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर जलकुंभ”
5) ” पं. दीनदयाळ उपाध्याय अग्निशमन केंद्र”
6) “आद्य क्रांतिकारक राधोजी भांगरे” बाजार ओटे
असे नामकरण केलेले आहे.सामाजिक,राष्ट्रीय भान ठेवून सर्वसमावेशक नामकरण करण्यात आलेले आहे.
