देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मित्रा ही संस्था यशस्वी होईल:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव

पर्यावरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षा मुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- पर्यावरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षा मुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये मित्रा ही संस्था निर्माण करण्यात आलेली असून देशात आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर ही संस्था यशस्वी होईल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

मित्रा संस्थेच्या नाशिक येथील नवीन संकुलाचे ई उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार सरोज आहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, मित्राचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, संचालक प्रशांत भामरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अतिशय चांगले वातावरण असलेल्या नाशिक येथे मित्रा संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही संस्था अतिशय उपयोगी ठरणार आहे. मित्रा येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्ती नाशिक जिल्ह्यात असंख्य ठिकाणाचा अभ्यास तसेच पर्यटन करता येणे शक्य होणार आहे. पर्यावरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षा मुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचे संशोधन या ठिकाणी होईल शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे तसेच शहर स्वच्छ राहणे अतिशय आवश्यक असते. ती आपल्या माध्यमातून होत आहे. ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे.
राज्यात अतिशय यशस्वीपणे येवल्यातील अडतीस गाव पाणी योजना सुरू असून देशभरात या पाणी पुरवठा योजनेचा गौरव करण्यात आलेला आहे. येथील नागरिकांच्या हातात संस्थेचे नियोजन सुरू असल्याने यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा हा अग्रेसर आहे. त्यामुळे मित्राच्या धर्तीवर कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कृषी भवन निर्माण करण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *