
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील डॉ.दत्तात्रय म्हसु कोळपे व डॉ.सौ.नयना दत्तात्रय कोळपे यांची कन्या कु.स्रुष्टी व सुरेगाव येथील डॉ.अतुल गायकवाड व डॉ.सौ.योगिता अतुल गायकवाड याची कन्या कु.आर्या या दोन डाॅक्टर दाम्पत्याच्या कन्यांची अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.सदर विद्यार्थीनी या राधाबाई काळे कन्या विद्यालयात शिकत असुन त्यांना जिल्हापरिषद शिक्षक दशरथ शेळके सर यांचे मार्गदर्शन लाभले.या कन्यांच्या यशाबद्दल कोळपेवाडी व सुरेगाव ग्रामस्थ,परीसरातील सर्व डॉक्टर्स यांनी अभिनंदन केले आहे.
