

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रभाग क्र 9 मध्ये पाण्याची टाकी , मारूती मंदिर , लक्ष्मीनगर ह्या ठिकाणी कोरोना लसीकरण पार पडले , 350 नागरिकांना डोस देण्यात आले त्या वेळेस सौ माधविताई वाघचौरे, विरेन बोरावके(नगरसेवक) मुख्यधिकारी गोसावी साहेब, सौ. कांडेकर (आहेर) मॅडम व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होते. यावेळी विरेन बोरावके म्हणाले, कोविड कोविशील्ड कॉव्हँक्सीन हे डोस प्रत्येकाने घेतले पाहिजे या आपल्या जनतेच्या सुरक्षतेसाठी आपण सर्वांनी हे डोस आपण घ्यावे अशी सर्व जनतेला आग्रहाची विनंती करतो व तसेच सौ माधविताई वाघचौरे नगरसेविका यांनी जनतेस प्रोत्साहन केले आपण आपल्या घराच्यांच्या ,व आपल्या परिसरातील सुरक्षिततेसाठी हे डोस घ्यावे आणि आपण आरोग्य विभागास सहकार्य करावे असे मी लक्ष्मीनगर मधील नागरिकांना विनंती केली याप्रसंगी विरेन बोरावके , माधविताई वाघचौरे (नगरसेवक) , यांच्या कडुन मुख्याधिकारी गोसावी साहेब, सौ.कांडेकर (आहेर) मँडम व त्यांच्या सर्व स्टाफचे आभार मानले.


