गोदामाई आणि कोपरगाव:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर….

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- गावाला वळसा घालून जाणारी गोदावरी नदी नदीच्या काठावर वसलेली अनेक गाव वस्त्या वाड्या अनेक ठिकाणी लांबपर्यंत नेलेले सायपन पाणीपुरवठा योजना शेतीसाठी पाणी उद्योग धंद्यासाठी पाणी आणि अजून खूप काही
नदी म्हणजे गावचे वैभव सुखसमृद्धी आरोग्य वाहिनी अनेक सामाजिक धार्मिक शैक्षणिक आर्थिक उलाढाली याच नदीवर / नदीकाठी/ आणि साक्षीने होत असतात भल्या बुरया घटना सुखदुःख नदीच्या साक्षीने पार पडत असतात


गंगा गोदावरी नदीच्या अनेक रूपाचे वर्णन/ दर्शन केले आहे तहान भागवणारी नदी जीवही घेताना दिसते
माणूस नदीचा कसा वापर करतो हे काळानुसार बदलत आहे नदीने आपली सीमा ओलांडून गैर केले तर ती बदनामीस पात्र होते गावाची शोभा वाढवत वाहणारी नदी दुथडी भरून वाहू लागली तर समधान वाटते पण पात्र सोडून गावात शिरु लागताच जीवघेणी ठरू पाहते आणि आलीच तर अतोनात नुकसान करून जाते


गोदावरी पवित्र पावन झाली आहे तीचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे ते आपल्या हाती आहे शहराचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करून योग्य पद्धतीने सोडणे रासायनिक कारखान्याचे दूषित पाण्यामुळे नदीचे आरोग्य बिघडते ते आपल्या हाती आहे निर्माल्य केरकचरा नदीत न टाकता योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे
नदी स्वच्छ राहीली तर माणसाचे आरोग्य टिकणार आहे
नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे अन्यथा संकटाचा सामना करण्यासाठी तयारी करणे
जय गंगे. जय भागीरथी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *