कोपरगांवात लाभार्थी सन्मान दिन साजरा…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंख्य गोर गरीबांसह, निराधारांना आधार देवुन त्यांच्यापर्यंत केंद्र शासनांच्या विविध योजनांचा पुरेपुर लाभ मिळवून देत भारताची ओळख जगात निर्माण केली असे प्रतिपादन भाजपचे सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्यावतीने समर्थ बुथ अभियान व लाभार्थी सन्मान दिवस साजरा करण्यात आला, सर्व लाभार्थ्यांचा सन्मानपत्रासह सन्मान केला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्याबददल माहिती दिली. तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केंद्र शासनाच्या विविध सोळा योजनांची माहिती देवून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना त्याचा किती प्रमाणांत लाभ झाला याबददल प्रास्ताविक केले. भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विकासकार्याची माहिती दिली.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सचिव कैलास खैरे, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, विनोद राक्षे, नरेंद्र डंबीर, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, सरचिटणीस दिपक चौधरी, सरपंच सतिष केकाण, प्रशांत वाबळे, शहर उपाध्यक्ष रविंद्र रोहमारे, प्रसाद आढाव, भिमा संवत्सरकर, अल्ताफ कुरेशी, उत्तरनगर जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ साठे, तालुका प्रसिध्दीप्रमुख कानिफनाथ गुंजाळ, जयेश बडवे, फकिरमहंमद पहिलवान, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष खालीलभाई कुरेशी, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिपक राउत, दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकूंद काळे, ओबीसी शहराध्यक्ष जगदिश मोरे, तालुका उपाध्यक्ष हरिभाठ लोहकणे, अनुसुचित जाती सेलचे शहराध्यक्ष शंकर बि-हाडे, किसान आघाडीचे शहराध्यक्ष सतिष रानोडे, मनोज इंगळे, सोमनाथ अहिरे, सुनिल बहुळकर, महेश पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, वाढदिवसाचे महत्व प्रत्येकाच्या जीवनांत अनोखे असून त्याची विशेष आठवण ठेवुन तो साजरा केला तर त्याचा आनंद अधिक द्विगुणित होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत साध्या राहणीमानातून आपले जीवन देशाला समर्पित केले. १३० कोटी देशवासियांना जनधन, उज्वला गॅस, शेतकरी सन्मान, स्वच्छ भारत अभियान, मुद्रा लोन, आत्मनिर्भर पथविक्रेते, पीकविमा, अटल पेन्शन, बेटी बचाव बेटी पढाव यासह १६ योजनांचा थेट तळागाळापर्यंत लाभ पोहोचविला आहे. कोरोना काळात ८० कोटी लोकांना मोफत स्वस्त धान्य दिले. कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्यावतीने धन्यवाद मोदीजी पोष्टकार्ड मोहिम राबवून त्यांचा वाढदिवस अनोख्यारित्या साजरा केला आहे. गरीबांच्या चुलीपर्यंत विचार करून त्यावर अग्रहक्काने योजना बनविल्या असे त्या म्हणाल्या. सुत्रसंचलन सरचिटणीस दिपक चौधरी यांनी करून आभार मानले.

फोटो ओळी:- कोपरगाव
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्यावतीने समर्थ बुथ अभियान व लाभार्थी सन्मान दिवस साजरा करण्यात आला, सर्व लाभार्थ्यांचा भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *